इंडिया वूमन्स क्रिकेट टीमने शनिवारी 28 जून रोजी ट्रेंट ब्रिज, नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर मात करत टी 20I मालिकेची जबरदस्त सुरुवात केली. भारताने इंग्लंडचा पहिल्या सामन्यात 97 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानतंर आता इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना कधी आणि कुठे होणार? हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना मंगळवारी 1 जुलै रोजी होणार आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल येथे आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स दुसरा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल.
क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसरा सामना पाहण्यासाठी पहिल्या सामन्याच्या तुलनेत आणखी 4 तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. इंग्लंड-इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात झाली होती. मात्र दुसरा सामना हा 11 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण पाहण्यासाठी चाहत्यांना काही तास झोपमोड करावी लागणार इतकं मात्र निश्चित आहे.