Mumbai Metro: मेट्रो स्थानकांच्या नावांना विरोध, नामांतरणासाठी परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव; काय आहे स्थानकांच्या नावाची यादी?
esakal July 01, 2025 11:45 AM

ठाणे : मेट्रो ९ आणि मेट्रो १० ठाणे व भाईंदर या दोन महापालिका क्षेत्रातून धावणार आहे. या मेट्रोच्या स्थानकांची नावे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सुचवली आहेत. अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या नावांवर आक्षेप घेत, ठाणे आणि भाईंदर या पालिकांच्या हद्दीतील गाव-खेड्यांचे गावपण जपण्यासाठी व आगरी-कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मूळ गावांचा तसेच आदिवासी बांधवांनी सुचविलेल्या नावांचा विचार व्हावा, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

चाकरमान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी शहरांना जोडणाऱ्या मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यानुसार मेट्रो ९ व मेट्रो १० या दोन्ही मार्गिका ठाणे व भाईंदर महापालिका क्षेत्रातून जात आहे. अशातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ असलेल्या ओवळा-माजिवडा क्षेत्राचादेखील त्यात समावेश आहे. या मतदारसंघात अनेक गावे व आदिवासी पाडे असून ठाणे व मिरा-भाईंदर शहराच्या जडण-घडणीत व विकासात आगरी-कोळी समाजाचे फार मोठे योगदान आहे. याठिकाणी सध्या मेट्रोची कामे सुरु असून त्यांचे लवकरच लोकार्पण देखील होणार आहे.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिक, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावे सुचविलेली आहेत. त्यामध्ये एखाद्या विकसकाने विकसित केलेल्या प्रकल्पांची नावे देखील देण्यात आलेली आहेत. वास्तविक पाहता या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील गाव-खेड्यांचे गावपण जपण्यासाठी व आगरी-कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मूळ गावांचा तसेच आदिवासी बांधवांनी सुचविलेल्या नावांचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मेट्रो क्रमांक ९ च्या डोंगरी येथे वेलंकनी देवीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे डोंगरी कारशेडला वेलंकनी देवीचे नाव देण्यात यावे. तसेच मेट्रो क्रमांक ४ मोघरपाडा येथे पुरातन कापरादेव मंदिर असल्याने मोगरपाडा कारशेडला कापरादेव असे नाव देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.

Thane News: पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात, चीनमध्ये पोहचला ठाणे जिल्ह्यातील महिलांचा गट स्थानकांची नावे

मेट्रो-४

१) गायमुख भाईंदरपाडा २) मोघरपाडा ओवळा ३) वाघबीळ ४) कासारवडवली ५) मानपाडा ६) तत्त्वज्ञान विद्यापीठ ७) कापूरबावडी ८) माजीवडा ९) कॅडबरी जंक्शन ऐवजी ठाणे महानगरपालिका भवन १०) छत्रपती संभाजी नगर स्थानक ११) आरटीओ १२) तिन हात नाका ऐवजी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्थानक.

मेट्रो-९

१) दहिसर २) पांडुरंग वाडी ३) मीरा गाव ४) काशिगाव ५) साईबाबा नगर ६) मेडतिया नगर ऐवजी प.पू. नानासाहेब धर्माधिकारी स्थानक ७) शहीद भगतसिंग नगर उद्यान ८) नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक

मेट्रो-१०

१) भाईंदर पाडा गायमुख २ ) रेतीबंदर ऐवजी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटी 3) चेना व्हिलेज ऐवजी चेना गाव ४) वसोर्वा ५) काशिमिरा ६) दहिसर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.