Chhaya Kadam : कपाळावर टिळा अन् पारंपरिक साज; मराठमोळी अभिनेत्री पंढरीच्या वारीत, पाहा VIDEO
Saam TV July 01, 2025 03:45 PM

सध्या सर्वत्र वारीचा उत्साह पाहायला मिळत आहेत. वारकरी विठ्ठलाचा गजर करत पंढरपूरला (Pandharpur Wari) जात आहेत. या वारीत सामान्यपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण सहभागी होत आहेत. आपला वारीचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगतात. अलिकडेच मराठी अभिनेत्री सायली संजीव वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

वारीचामंत्रमुग्ध करणारा अनुभव मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने (Chhaya Kadam ) घेतला आहे. तिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री छाया कदम वारीत सहभागी झाली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वारीत दर्शन घेताना दिसत आहे. तसेच तिने वारकऱ्यांसोबत फुगडी देखील घातली आहे.

छाया कदम लूक

छाया कदम वारीत पारंपरिक पोशाखात पाहायला मिळाली. तिने सुंदर साडी नेसली होती. साडीत त्यांचे सौंदर्य खुललं होते. नाकात नथ, केसात गजरा आणि डोक्यावर टिळा लावून विठ्ठलभक्तीत छाया कदम तल्लीन झालेली पाहायला मिळत आहे. ती व्हिडीओमध्ये हातात बांगड्या भरताना देखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

अभिनेत्रीचा हा वारीचा पहिला अनुभव होतात. तिने या पोस्टला खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की,"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...||विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल||याची देही याची डोळा,ऐसा देखिला सोहळा..." छाया कदमच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री वारीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने वारीत खेळ देखील खेळले आहेत. छाया कदमचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने मराठी आणि हिंदीत काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

Naseeruddin shah : "ही जुमला पार्टीची घाणेरडी चाल"; नसीरुद्दीन शाहचा दिलजीत दोसांझला सपोर्ट, नेमकं प्रकरण काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.