Zee Marathi Paaru Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू'मध्ये आता प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेतील जुनी खलनायिका दिशा पुन्हा एकदा किर्लोस्कर कुटुंबात सून म्हणून प्रवेश करताना दिसणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या मालिकेत पारू आणि आदित्यची प्रेमकहाणी पुढे जात आहे. पारूच्या वडिलांना या नात्याची माहिती असल्याने ते त्याचा विरोध करत आहेत. दुसरीकडे, अनुष्का आणि दिशा यांच्या कटकारस्थानाचा भांडाफोड पारूने केला होता. यात अनुष्काचा मृत्यू झाला, तर दिशा सुटून बाहेर पडली.
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाने तिच्या मृत्यूआधी घेतलं होतं हे इंजेक्शन; मैत्रिणीने केला मोठा खुलासा, म्हणाली 'मी तिथेच उभी...'आता दिशा नविन नाव घेऊन किर्लोस्कर घरात सून म्हणून परत येणार आहे. ती अहिल्यादेवीसमोर ठामपणे उभी राहत "मी होणार ह्या घरची सून" असं स्पष्ट सांगते. दिशाची एन्ट्री देखील होणार सून मी ह्या घरची या गाण्याने होती. ज्यामध्ये सगळे स्थिर उभे असलेले दिसत आहेत तर, दिशा एकटीच सगळ्या कुटुंबाभोवती नाचताना दिसत आहे.
Fenugreek Water: सकाळी रिकाम्या पोटी मेथी पाणी प्यायल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदेView this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
या दिशाच्या एन्ट्रीवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले,नसेल सुचत नवीन काही तर संपून टाका ना. आणखी एकाने लिहीले, सासू Mom बोलणारी आली. तर एका नेटकऱ्याने लिहिले, ती दिशा सारखी जाऊन येईल पण paru अणि आदित्य लग्न kai या जन्मात होणार नाही.
दिशाचा खरा हेतू काय आहे आणि ती पुढे काय करणार हे येणाऱ्या भागांमध्ये उघड होणार आहे. दिशाच्या पुनरागमनामुळे मालिकेत नवा रंग भरला जाणार असून पारू-आदित्यच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.