'Sitaare Zameen Par'ची बॉक्स ऑफिसवर जादू फेल, ११ व्या दिवशी कमाईत घसरण
Saam TV July 01, 2025 04:45 PM

'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par') चित्रपट रिलीज होऊन आता दीड आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कायम चढउतार पाहायला मिळाले आहेत. मात्र चित्रपटाने दोन्ही वीकेंडला चांगली कमाई केली आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान (Aamir Khan ) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला रिलीज झाला आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

View this post on Instagram

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11
  • दिवसपहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 6.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6.65 कोटी रुपये

  • नववा दिवस - 12.6 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 14.50 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 3.27 कोटी रुपये

  • एकूण - 126.4 कोटी रुपये

'सितारे जमीन पर' जगभरातील कमाई

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 198 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. लवकरच चित्रपट 200 कोटी पार करणार आहे. हा चित्रपट शिक्षकआणि मुलांच्या नात्यावर आधारित आहे

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत जिनिलिया देखील झळकली आहे. या चित्रपटातील गाणी चाहत्यांना खूप आवडली आहे. तसेच चित्रपटातील आमिर आणि जिनिलियाच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे.

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

'सितारे जमीन पर' चित्रपटात 10 नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद येत आहे.

Maa Box Office Collection : काजोलचा 'माँ' फ्लॉप की हिट? चौथ्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.