पंचांग -
मंगळवार : आषाढ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ५.४६, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय सकाळी ११.१४, चंद्रास्त रात्री ११.४०, विवस्तत सप्तमी, भारतीय सौर आषाढ १० शके १९४७.
दिनविशेष -
१९९७ - शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टरच्या यादीत भारताच्या कुंजुरानी देवीचा समावेश करण्यात आला.
२००४ - अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्राने बांधलेले कॅसिनी अंतराळयान ३.५ अब्ज किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले.
२०१४ - भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ अखौरी सिन्हा यांचे नाव अंटार्क्टिका खंडावरील एका पर्वताला देऊन अमेरिकेने त्यांचा सन्मान केला.