मुंबई : आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढे चांगले. विरोधकांना उघड पाडताना स्वतः उघड होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढे मोठे यश मिळवले ते चुकीचे बोलून घालवू नका.
शिस्तीला तडा जाईल असे काही करू नका,’’ असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आणि आमदारांना दिला.मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या.
मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी आग्रही असल्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. आपण केलेल्या कामांची ‘ब्रेकिंग न्यूज’ व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली.
शिंदे यांचे आवाहन
शिवसेनेत निवडणुका होणार. त्यासाठी सज्ज व्हा
शाखाप्रमुखापासून तर मुख्य नेत्यापर्यंत सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार
पक्षाचे सक्रिय सदस्य हेच मतदार असतील
डिजिटल म्हणजे ऑनलाइन पद्धतीने आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीने अशा सात टप्प्यांत निवडणूक
एकदिलाने काम करायचे आहे
निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हवा
उमेदवार चुकला की संपले
जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा
नोंदणी करताना प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठरवून नोंदणी करा