विद्यार्थ्यांची पिळवणूक
esakal July 02, 2025 01:45 AM

पिंपरी, ता. १ : शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास (सारथी) संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांकडून हमीपत्र, बंधपत्र आणि प्रतिज्ञापत्र या तीन वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी प्रत्येकी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून घेण्यास सांगितले जात आहे.

मागील वर्षी निवड झालेल्या तब्बल ७५ विद्यार्थ्यांना एकाही रुपयाची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे परदेशात आर्थिक संकटात आहेत. काहींनी शिक्षणाचे कर्ज काढले आहे, काहींनी जेवणाचे खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाईम नोकऱ्या पत्करल्या आहेत. तरीही ‘सारथी’कडून कोणतीही मदत नाही. म्हणजेच फक्त कागदांची पूर्तता करण्यासाठी हजारोंचा खर्च विद्यार्थ्यांकडून करवून घेतला जातोय. त्यानंतर सारथी प्रशासनाकडून ‘बजेट नाही’ असे उत्तर दिले जात आहे.


‘हा निव्वळ टोलवाटोलवीचा खेळ आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट होण्याची वेळ आली आहे, तरीही सारथीने नवीन ‘नियमावली’ लागू करत सर्व प्रक्रियेला क्लिष्ट आणि विलंबित केले आहे.’
- समर पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी

‘शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांचा हक्क आहे, उपकार नव्हे. ही योजना गाजावाजा करायची आणि प्रत्यक्षात मदतच करायची नाही. हे धोरण बंद झाले पाहिजे. आता फक्त विद्यार्थ्याकडून सातबारा लिहून घ्यायचा राहीला आहे.’
- ॲड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँडस

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.