मुंबई (भांडूप) : भांडुप परिसरातील बहुमजली इमारतीच्या टेरेसवरून पडून १५ वर्षांच्या मुलीचा २३ जून रोजी मृत्यू झाला होता. या मुलीनं अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचं तिच्या मित्राने पोलिसांना सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात या मुलीला मित्रानेच धक्का दिल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करणार असून त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाला नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. यामुळे तो आधीच मानसिक तणावात होता. या काळात त्याच्या एका मित्राने त्याची चेष्टा केल्याने तो अधिक अस्वस्थ झाला. अशा मनःस्थितीत असतानाच त्याच्या मैत्रिणीने त्याला भेटण्यासाठी त्याच बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले होते.
Eknath Shinde : बाप तो बापही होता हैं! मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोंलेंना एकनाथ शिंदेंनी सुनावलंतेथे दोघांमध्ये बोलणे सुरू असताना मुलीने मुलाला डेटिंगसाठी विचारलं. मात्र, मुलाने तिला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून दिलं. त्यात या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भांडुपपोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास भांडूप पोलीस करत आहेत.
दरम्यान, घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तत्काळ या तरुणीला पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात नेलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि प्रकरणाचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू होता. त्यावेळी घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागात मित्रानेच मुलीला धक्का दिल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे, या प्रकरणी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करणार आहोत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मुलगाही अल्पवयीनच आहे.
Nanded : डांबरीकरण झालेला रस्ता चक्क हाताने उखडला; लोहा तालुक्यात निकृष्ट दर्जाचे काम