भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक कमबॅक करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितलं की, ‘आम्ही गोलंदाजी करणार आहोत. ओव्हरहेड परिस्थिती अनुकूल आहे. सर्वकाही विचारात घेतले. गेल्या आठवड्यात खूप चांगली सांघिक कामगिरी, आम्हाला विश्वास आहे. कसोटीच्या खोलवर जाताना तुम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेता. मालिकेच्या सुरुवातीलाच धावांचा यशस्वी पाठलाग केला.पण या आठवड्यात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.’दुसरीकडे, नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकुरला आराम दिला आहे.
शुबमन गिल म्हणाला ‘मीही प्रथम गोलंदाजी केली असती. जर विकेटमध्ये काही असेल तर ते पहिल्या दिवशी दिसेल. संघात तीन बदल केले आहेत. रेड्डी, वाशी आणि आकाश दीप आले आहेत. बुमराह नाही. फक्त त्याच्या कामाचा ताण सांभाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सामना आहे. पण तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर असल्याने आम्हाला वाटते की त्या खेळपट्टीवर आणखी काही असेल म्हणून आम्ही त्याचा वापर करू. आम्हाला कुलदीपला खेळवण्याचा मोह झाला होता पण शेवटच्या सामन्याकडे पाहता आमच्या खालच्या फळीने चांगली कामगिरी केली नाही, म्हणून फलंदाजीत थोडी खोली जोडण्याचा निर्णय घेतला.’
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर