ऑफिसमध्ये काम करताना चहा लागणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मानसिक थकवा, कामाचा ताण किंवा मिटिंगच्या आधी थोडा फ्रेश होण्यासाठी एक कप चहा हवीच असते. पण बऱ्याच कार्यालयांमध्ये मिळणाऱ्या चहा इतकी वाईट चव असते की, ती प्यायची इच्छा होत नाही. केवळ पाणच असतं, चहा पत्तीचा स्वाद नसतो, आणि दूधाचा पत्ता नसतो. अशा चहा ऐवजी आपण घरच्या घरी एक खास झटपट तयार होणारी चहा प्रीमिक्स पावडर तयार करू शकतो.
ही पावडर तुम्ही एका वेळेस तयार करून एअरटाइट डब्यात भरून ठेवू शकता. मग ऑफिसमध्ये कधीही गरम पाण्यात 2 चमचे मिसळा आणि तयार होईल एकदम टेस्टी आणि ताजगीदायक चहा. चला तर मग पाहूया ही प्रीमिक्स पावडर बनवायची सोपी पद्धत.
सर्वप्रथम, बारीक केलेली चहा पावडर आणि साखर एकत्र एका मोठ्या बाऊलमध्ये घ्या. त्यात मिल्क पावडर, आले पावडर, वेलदोडा पावडर आणि हवं असल्यास दालचिनी पावडर घालून सगळं चांगलं मिक्स करा. सर्व साहित्य एकसंध मिसळल्यावर हे मिश्रण एका एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा.
ही चहा प्रीमिक्स पावडर 15 ते 20 दिवस टिकते आणि तिचा स्वादही जसाच्यातसा राहतो. आता जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये चहा प्यायची इच्छा होईल, तेव्हा फक्त 1 कप गरम पाण्यात 2 चमचे ही प्रीमिक्स पावडर मिसळा, नीट ढवळा आणि तुमचा घरगुती, टेस्टी चहा तयार!
या चहा प्रीमिक्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. ऑफिसमध्ये, प्रवासात, कॅम्पिंगला किंवा अगदी लाँग मिटिंगमध्ये – फक्त गरम पाणी असलं की तुमचा आवडता चहा तयार! यामुळे ऑफिसमधील चवहीन चहापासून सुटका होईल आणि ताजगी कायम राहील.
चहा प्रेमींनी ही घरगुती रेसिपी एकदा नक्कीच करून बघावी. ही पावडर बनवायला कमी वेळ लागतो आणि खर्चही कमी. यामुळे तुमच्या ऑफिसमधील प्रत्येक दिवस होईल चवदार आणि ऊर्जावान!
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)