पुणे हादरले! घरात घुसून महिलेवर बलात्कार, कृत्यानंतर नराधमाने सेल्फी काढला अन् 'परत येईल' अशी दिली धमकी
Saam TV July 03, 2025 04:45 PM

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune rape case, Kondhwa crime : बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. कोंढव्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये २५ वर्षीय महिलेवर घरातून घुसून बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कुरिअर बॉय असल्याचे सांगत घरात घुसला, तोंडावर स्प्रे मारून बलात्कार केला. या कृत्यानंतर नराधमाने सेल्फी करत परत येईल असा मेसेज लिहिला. या घटनेनंतर कोंढव्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कोंढवामधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून "मी पुन्हा येईन" असा संदेश ठेवून तीव्र मानसिक धक्का दिला आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला “कुरिअर आहे” असे सांगितले. महिलेने “हे कुरिअर माझे नाही” असे स्पष्ट सांगून नकार दिला. मात्र आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला.

Crime : एकतर्फी प्रेमातून भयंकर कृत्य, रूग्णालयात जाऊन नर्सचा गळा चिरला, लोकं बघत उभे राहिले

त्यामुळे महिलेला सेफ्टी डोअर उघडावा लागला. त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर एखादा केमिकल स्प्रे फवारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कारकेला. घटनेनंतर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला. तसेच 'मी पुन्हा येईन' असा मजकूर टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chemical Factory Blast : केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटात ३६ जणांचा मृत्यू

ही घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत आत प्रवेश केला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी कसून चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

Japan Airlines : उड्डाण घेताच विमानात बिघाड, १० मिनिटांत २६००० फूट खाली आले, १९१ प्रवाशांचा जीव टांगणीला
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.