सध्या बाजारात मिळणाऱ्या वस्तूंमध्ये भेसळ ही एक मोठी समस्या बनली आहे. घी, मावा, पनीर यांसोबतच आपल्या रोजच्या जेवणात वापरलं जाणारं गहू पीठही याला अपवाद नाही. विशेषतः सणासुदीच्या काळात जेव्हा मागणी वाढते, तेव्हा अनेक व्यापारी अधिक नफा कमावण्यासाठी भेसळीचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे घरात वापरण्यात येणारे पीठ खरंच शुद्ध आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. काही सोप्प्या घरगुती उपायांनी तुम्हीच हे तपासू शकता. चला जाणून घेऊया हे उपाय काय आहेत.
जर पीठात चुना किंवा चॉक पावडरची भेसळ आहे की नाही हे तपासायचं असेल, तर थोडं पीठ टेस्ट ट्यूबमध्ये घ्या आणि त्यात काही थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड (HCl) टाका. जर त्यातून बुडबुडे आले किंवा पांढरी झाक आली, तर त्यात चुना मिसळलेला असण्याची शक्यता आहे. जर काहीही प्रतिक्रिया झाली नाही, तर पीठ शुद्ध आहे. हा प्रयोग करताना हातमोजे वापरणे आणि मुलांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
शुद्ध गव्हाच्या पिठाला एक हलकासा ताजा गंध असतो. जर पिठातून शीळा किंवा रासायनिक वास येत असेल, तर त्यात काहीतरी गडबड आहे. कारण गंध हे भेसळीचं एक महत्त्वाचं संकेत असू शकतं.
हे एक अतिशय सोप्पं आणि दररोज करता येणारं परीक्षण आहे. एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा पीठ टाका. जर पीठ पाण्यात मिसळून खाली बसलं, तर ते शुद्ध आहे. पण जर त्यावर काही तरंगू लागलं किंवा वर पांढरी परत तयार झाली, तर त्यात चॉक, स्टार्च यांसारख्या भेसळ असण्याची शक्यता आहे.
थोडं पीठ एका पांढऱ्या कागदावर घ्या आणि जाळा. शुद्ध पीठ जळताना मातीसारखा वास येतो, पण भेसळ असलेलं पीठ जळताना रासायनिक वास देतं.
शुद्ध पीठ हातावर रगडलं असता ते मऊ आणि थोडंसा तेलकट वाटतं. जर पीठ फिसळतंय किंवा चिकट वाटत असेल, तर ते भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.
जर गव्हाच्या पिठात कोंडा दिसत नसेल, तर ते मैद्याशी मिसळलेलं असू शकतं. शुद्ध गव्हाच्या पिठात थोडा कोंडा नक्कीच असावा, कारण तो फायबरचा चांगला स्रोत आहे
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)