गेल्या काही वर्षांत जागतिक परिस्थिती अस्थिर बनली आहे. सतत तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार जगात आहे. चीन आपली लष्करी ताकद वाढवत आहे. चीन अमेरिकेतील पेंटागॉनपेक्षा दहा पट मोठे मिलट्री सिटी बनवत आहे. बीजिंगच्या या मिलिटरी सिटीमध्ये तयार करण्यात येत असलेले बंकर अणुहल्ल्यालाही तोंड देण्यास सक्षम असणार आहेत. हे बंकर युद्धादरम्यान कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणूनही काम करू शकतात. आतापर्यंत पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी संरक्षण मंत्रालयाकडून चालवण्यात येणारी अधिकृत इमारत आहे. आता चीन त्यापेक्षा दहा पट मोठी सिटी तयार करत आहे. लष्करी तज्ज्ञ याला तिसऱ्या महायुद्धाची तयारी असल्याचे सांगत आहेत.
मिलिट्री सिटी बीजिंग शहरापासून 32 किलोमीटर दक्षिण-पश्चिममध्ये असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ चार किलोमीटर असणार आहे. त्यात बंकरसुद्धा असणार आहेत. हे बंकर अण्वस्त्र हल्लांना तोंड देण्यास सक्षम असणार आहे. सन 2022 मध्ये हा परिसर एक मैदान होता. सन 2024 च्या मध्यपर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करुन रस्ते आणि बोगद्यांचे नेटवर्क तयार करण्यात आले. चीनने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, मिलिट्री सिटी परिसरात ड्रोन उडवण्यास प्रतिबंध आहे. जवळ असणारे हायकिंग ट्रेल्स बंद करण्यात आले आहे. या भागात कॅमेरे किंवा इतर कोणत्याही प्रकारची टेहाळणी करण्यास बंदी घातली आहे. चीनने ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, या भागात चीन सैनिक दिसत नाही. परंतु अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, या ठिकाणी चीनचे कमांड सेंटर तयार होत आहे. शी जिनपिंग वेगाने आपले अण्वस्त्र भंडारही वाढत आहे. यामुळे नजीकच्या काळात अमेरिकेतील अण्वस्त्रांपेक्षा जास्त अण्वस्त्रे चीनकडे असण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अण्वस्त्र हल्लापासून संरक्षण करण्यासाठी चीन बंकर निर्माण करत आहे. उपग्रहांच्या छायाचित्रानंतर सर्वात पहिली रिपोर्ट फायनेन्शियल टाइम्सने दिली होती. त्यात छायाचित्रांमध्ये या भागात मिलट्री सिटी तयार होत असल्याचे दिसत आहे. चीनच्या या हालचाली म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची तयारी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.