इराण आणि इस्राईल यांच्यात जे युद्ध सुरु झाले त्याची झळ आता आखाती देशांनाही जाणवू लागली आहे. इराणने अमेरिकेचा बदला घेण्यासाठी कतार येथील अमेरिकन तळांवर हल्ला केल्यानंतर आता सौदी अरब देखील घाबरला आहे. यामुळे आता सौदी अरबने अमेरिकेची THAAD क्षेपणास्र संरक्षण प्रणाली सक्रीय केली आहे. सौदी अरबच्या संरक्षण मंत्र्यानेच ही कबुली दिली आहे.
मध्य पूर्वेत इराण आणि इस्राईल दरम्यान १२ दिवस युद्ध झाल्यानंतर अखेर आता सीजफायर झाला आहे. परंतू दोन्ही युद्धग्रस्त देशांपासून त्यांचे शेजारी आखातातील देश पुरते घाबरलेले आहे. याला कारण ठरले आहे अमेरिकेचे या युद्धात उतरणे. अमेरिकेने या युद्धात नाक खुपसल्याने इराणने कतारच्या अमेरिकी एअरबेसवरच मिसाईल हल्ला केला. त्यामुळे अमेरिकेशी व्यापारी संबंध असलेल्या आणि इराणला मदत न करणाऱ्या सौदी अरेबियाचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे सौदी अरबने आता अमेरिकेने दिलेली THAAD क्षेपणास्र संरक्षण प्रणाली एक्टीव्ह केली आहे. कारण आखाती देशात कतार नंतर कुवैत, जॉर्डन, बहारीन आणि सौदी अरबमध्ये अमेरिकेचे लष्करी हवाई तळ आहेत. तसेच सौदी अरबशी इराणची जुनी दुश्मनी देखील आहे. त्यामुळे सौदी अरब देशाने हालचाली करुन ही क्षेपणास्र प्रणाली सुरु केली आहे.
सौदी अरबच्या संरक्षण मंत्रालयाने देशात अमेरिकी THAAD क्षेपणास्र संरक्षण प्रणालीला सक्रीय करण्याची घोषणा केली आहे. मेहर वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार अमेरिकन निर्मित टर्मिनल हाय एटीट्युट एरिया डिफेन्स (THAAD) च्या तैनातीमुळे छोट्या आणि मध्यमपल्ल्याच्या बॅलेस्टीक मिसाईलना रोखता येऊ शकते. सौदी अरबमध्ये आयोजित ट्रेनिंगनंतर जेद्दा प्रांतात वायु रक्षा बल अनुसंधान केंद्राच्या समारंभात ही प्रणाली सुरु केल्याची घोषणा इराणच्या संरक्षण मंत्र्यांनी केली आहे.
हे पाऊल उचलण्याचा उद्देश्य देशाची हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करणे आणि आपल्या महत्वाच्या स्थळांची सुरक्षा करणे हा असल्याचे सौदी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या दरम्यान अमेरिकन वृत्तपत्र न्यूजवीकमध्येही या संदर्भात एक वृत्त आले आहे. त्यानुसार अमेरिकेने मिसाईल हल्ल्याचा धोक्यांच्या विरोधात इस्राईलची बाजू घेताना अलिकडे THAAD मिसाईल संरक्षण प्रणालीवर २० टक्के खर्च करण्यात आला आहे.