Bangladesh loses 7 wickets for 5 runs, Sri Lanka wins opener : कसोटी मालिकेतील विजयानंतर श्रीलंकेने वन डे मालिकेतही विजयी सुरूवात केली. बांगलादेशला पहिल्या वन डे सामन्यात ७७ धावांनी पराभूत करून यजमान श्रीलंकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यापैकी मैदानावर सापाचे दिसणे व त्यानंतर बांगलादेशचा डाव कोसळणे, या लोकांच्या चर्चेचा विषय़ ठऱले.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेला २९ धावांत ३ धक्के बसले. कुसल मेंडिस व कर्णधार चरिथ असलंका यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. कुसल ४३ चेंडूंत ४५ धावांवर तन्वीर इस्लामच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने श्रीलंकेचे विकेट सत्र सुरूच राहिले, परंतु असलंका मैदानावर शड्डू ठोकून उभा होता. जनिथ लियानागे ( २९), मिलन रत्ननायके ( २२) व वनिंदू हसरंगा ( २२) यांच्या हातभाराने श्रीलंकेला २४४ धावांपर्यंत पोहोचवले.
IND vs ENG 2nd Test: कॅप्टन शुभमन गिलचे शतक! भारतीय संघाचे इंग्लंडला सडेतोड उत्तर; पायात क्रॅम्प आल्यानंतरही मैदानावर उभा राहिलाअसलंका १२३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला. वन डे क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये असलंकाने ( ५) बांगलादेशच्या शाकिब अल हसनची बरोबरी करताना सुरेश रैनाचा ( ४) विक्रम मोडला. या विक्रमात युवराज सिंग ( ७) व महेंद्रसिंग धोनी ( ६) हे आघाडीवर आहेत. बांगलादेशच्या तस्कीन अहमदने ४ व तंझिम हसन साकिबने ३ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा सलामीवीर परवेझ होसैन इमोन ( १३) स्वस्ता माघारी परतला. नजमूल होसैन शांतो ( २३) व तंझिद हसन यांनी डाव सावरला होता, परंतु ही जोडी तुटली अन् बांगलादेशचा डाव गडगडला. १०० धावांवर बांगलादेशची दुसरी विकेट पडली आणि त्यानंतर त्यांचा संपूर्ण संघ १६७ धावांवर माघारी परतला. १ बाद १०० वरून त्यांचे ७ फलंदाज फक्त पाच धावांवर तंबूत परतले.
ENG-U19 vs IND-U19: ९ षटकार, ६ चौकार! वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी, थोडक्यात हुकली Century; इंग्लंडची उडाली भंबेरीत्यांच्याकडून तंझिदने ६१ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६२ धावांची खेळी केली. सातव्या क्रमांकावर आलेल्या जाकेल अलीने ६४ चेंडूंत ५१ धावा केल्या. बांगलादेशचा संपूर्ण संघ ३५.५ षटकांत १६७ धावांत तंबूत परतला. वनिंदू हसरंगाने ४, तर कमिंदू मेंडिसने ३ विकेट्स घेतल्या.