सध्या सोशल मीडियावर लातूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपे (Latur Farmer) शेतात नांगरताना दिसत आहे. त्यांच्याकडे बैल नसल्यामुळे वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. या वृद्ध जोडप्याची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट असल्यामुळे त्यांना असे करावे लागत आहे. या व्हिडीओ पाहताच बॉलिवूड मधून एका अभिनेत्याने मदतीचा हात पुढे केला आहे.
बॉलिवूडचा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सोनू सूद(Sonu Sood) आहे. हा व्हिडीओ पाहून सोनू सूदने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करून त्यावर लिहिलं की, "आप नंबर भेजिए। हम बैलभेजतें हैं।" सोनू सूदच्या या कृतीने साऱ्यांचे मन भारावून गेले आहे. सोनू सूद कायम गरजूंना मदत करताना पुढे असतो.
वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ पाहून स्थानिक प्रशासन देखील सक्रिय झाले आणि मदतीसाठी वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी यांनी देखील या जोडप्याला मदत केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी वृद्ध जोडप्याची भेट घेतली आहे. त्यांना कृषीविभागात सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितले आणि लवकरच ती उपकरणे त्यांना पुरवली जाणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील 65 वर्षीय अंबादास पवार आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांच्याकडे बैल खरेदी करायला देखील पैसे नाही आहे. म्हणून वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. हे जोडपे लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील रहिवासी आहेत. त्यांनी सरकारकडे कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. ते अडीच एकर कोरडवाहू जमिनीचे ते मालक आहेत. खतांचा खर्च, ट्रॅक्टर, बैल परवडत नसल्यामुळे हे जोडपे शेतात राबतात.
Chala Hawa Yeu Dya 2 : 'चला हवा येऊ द्या २'मधून निलेश साबळेची एक्झिट, तर 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री