श्रीगोंदेतील धक्कादायक प्रकार! 'शाळेतील सव्वादोन टन तांदूळ गायब'; शाळेची संभाजी ब्रिगेडने केली भांडाफोड
esakal July 01, 2025 07:45 PM

श्रीगोंदे : शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेतील पोषण आहारातील तांदुळाच्या साठ्याचा तपशील आणि प्रत्यक्ष साठा यात तब्बल २ हजार ३८५ किलोची तफावत आढळून आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची भांडाफोड केली.

धक्कादायक प्रकार! 'आठ कोटी रक्कम देशभरातील पाचशे खात्यांवर वर्ग'; दहशतवादी संघटनेला पैसे पाठवण्याचे सांगितले कारण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत पोषण आहारात अनियमितता असल्याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी पंचायत समितीला निवेदन दिले होते. आज (ता.३०) त्यांनी पोषण आहार अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्यासह शाळेत जाऊन नोंदवही व प्रत्यक्ष साठा तपासला. त्यावेळी २८ जूनपर्यंत ४ हजार ३८५ किलो तांदूळ शिल्लक असल्याची नोंद होती. प्रत्यक्षात, तांदूळ मोजला असता तो सुमारे २ किलो आढळून आला. नोंदवहीपेक्षा सव्वादोन टनांहून अधिक तांदूळ कमी असल्याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

विद्यार्थ्यांमधील कुपोषण टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना सकस आहार मिळण्यासाठी शालेय पोषण आहाराची योजना राबवली जाते. मात्र, या योजनेत वेगवेगळ्या स्तरावरून ''गफला'' होत असल्याचे अनेकदा समोर येते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

शाळेतील ''रेकॉर्ड''पेक्षा तांदूळ कमी आढळून आला आहे. याबाबत मुख्याध्यापकांकडून खुलासा मागविणार आहोत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

- सत्यजीत मच्छिंद्र, पोषण आहार अधीक्षक

Sunil Shetty: पाकिस्तानी कलाकारांना बंदी योग्यच : सुनील शेट्टी; साईसमाधीचे घेतले दर्शन, चित्रपट तयार व्हावेत

तांदूळ कमी तर आढळला आहेच. शिवाय, जो शिल्लक होता तोही अस्वच्छ होता. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून मुख्याध्यापकांसह अन्य दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे.

- अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.