India U19 Clinch Win in England as Vaibhav Suryavanshi Stuns with 86
भारताच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने बुधवारी नॉर्थहॅम्पटन येथे इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघावर ४०-४० षटकांच्या सामन्यात विजय मिळवला. २६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या विजयाचा नायक वैभव सूर्यवंशी ठरला. त्याने ३१ चेंडूंत ८६ धावांची खेळी करताना संघाचा पाया मजबूत केला आणि त्यानंतर इतरांनी मोहिम फत्ते केली. भारतीय संघाने पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. सलामीवीर बीज डॉवकिन्सने ६१ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. इसाक मोहम्मदनेही ४२ चेंडूंत ४१ धावांची खेळी केली. बेन मायस ( ३१) ने चांगला खेळ केला. इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी याला १६ धावा करता आल्या.
SL vs BAN 1st ODI: सापाने 'ताप' वाढवला, बांगलादेशच्या ५ धावांत पडल्या ७ विकेट्स; श्रीलंकेचा दणदणीत विजयकर्णधार थॉमस रेव पुन्हा भारतीय गोलंदाजांना नडला. त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांची नाबाद खेळी केली. राल्फी अल्बर्टने २१ धावा करताना संघाला ६ बाद २६८ धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून कनिष्क चौहानने ८-१-३०-३ अशी स्पेल टाकली. दीपेश देवेंद्रन, विहान मल्होत्रा व नमन पुष्पक यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
आयुष म्हात्रेच्या गैरहजेरीत कर्णधार असलेल्या अभिग्यान कुंडूला १२ धावांवर माघारी जावे लागले. पण, वैभवने आक्रमक फटकेबाजी केली. पहिल्या दोन सामन्यांत त्याचे अर्धशतक हुकले होते, परंतु आज त्याने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताच्या युवा खेळाडूंमध्ये हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. रिषभ पंतने २०१६ मध्ये नेपाळविरुद्ध १८ चेंडूंत अर्धशतक केले होते.
IND vs ENG 2nd Test: कॅप्टन शुभमन गिलचे शतक! भारतीय संघाचे इंग्लंडला सडेतोड उत्तर; पायात क्रॅम्प आल्यानंतरही मैदानावर उभा राहिलावैभवला विहानची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी ७३ धावा जोडल्या. वैभव ३१ चेंडूंत ८६ धावांवर झेलबाद झाला. त्याने ६ चौकार व ९ षटकारा असे अवघ्या १५ चेंडूंत ७८ धावा कुटल्या. विहान ३४ चेंडूंत ४६ धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत ७ चौकार व १ षटकार होता. कनिष्कने ४२ चेंडूंत नाबाद ४३ आणि आर अंब्रिशने नाबाद ३१ धावा करताना भारताला ३४.३ षटकांत ६ बाद २७४ धावा करून विजय मिळवून दिला.