पाकिस्तानच्या सिंध प्रांतात बदीन जिल्ह्यात मतलीमध्ये एका 15 वर्षीय हिंदू मुलीच अपहरण करण्यात आलं. बंदुकीच्या धाकावर 4 मुलांनी हिंदू मुलीच अपहरण केलं. त्यानंतर तिच्यासोबत लग्न केलं. ही घटना समोर येताच संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली आहे. मानवधिकार आयोगाने संपूर्ण प्रकरणात रिपोर्ट सोपवलाय. सिंध प्रांत हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टे यांचा बालेकिल्ला आहे. डॉन वर्तमानपत्रानुसार, मतली गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने मानवधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे. आधी चार युवक त्याच्या घरात घुसले आणि 15 वर्षीच भाचीला उचलून घेऊन गेले.
पीडित व्यक्तीनुसार, काहीवेळाने भाचीसोबत लग्न केल्याची बातमी समोर आली. या व्यक्तीने प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या भागात बंदुकीच्या धाकावर मुलीच अपहरण केलं, तिथे लोकांमध्ये दहशत आहे. स्थानिक पोलिसांनुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. मंसूर डार आणि मकसूद डार ही दोन आरोपींची नावं आहेत. अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही.
पाकिस्तानात अशा गुन्ह्यासाठी शिक्षा काय?
मानवाधिकार आयोगाने पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 365-बी, 364-ए आणि 506 अंतर्गत कारवाई करण्यास सांगितलं आहे. आयोगाने तात्काळ मुलीला शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानात अल्पवयीन मुलींशी लग्न करणं हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी जामीन मिळत नाही. पाकिस्तान सरकारने यासाठी कठोर कायदा बनवला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्याला सात वर्ष कारवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
पाकिस्तानात किती लाख हिंदू?
वर्ष 2023 मध्ये कराचीत सुद्धा असच एक प्रकरण समोर आलेलं. त्यावेळी हिंदू संघटना रसत्यावर उतरलेल्या. त्यानंतर पाकिस्तान सरकारला पावलं उचलावी लागलेली. पोलिसांनी मुलीला शोधून काढून शेल्टर होममध्ये पाठवलेलं. पाकिस्तानात जवळपास 44 लाख हिंदू राहतात. बहुतांश हिंदू सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तान मानवधिकारानुसार त्यांच्या देशात हिंदुंची स्थिती मजूरांसारखी आहे.