थोडक्यात :
एक व्हायरल व्हिडिओमध्ये वृद्ध शेतकरी गुरं नसल्यामुळे स्वतःच्या ताकदीवर शेत नांगरताना दिसतो.
या भावनिक दृश्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले.
अभिनेता सोनू सूदने तत्काळ मदतीचा हात पुढे करत "मी गुरं पाठवीन" असे म्हणत मदतीचं आश्वासन दिलं.
Entertainment News : सोशल मीडियावर काही दिवसांपासून स्वतः शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. एक वृद्ध जोडपं गुरंढोरं नसल्यामुळे स्वतः शेत नांगरत आहेत. यातील वृद्धाने स्वतःच्या खांद्यावर नांगर घेतला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने मदत करण्याचं वचन दिलं.
एक्स या सोशल मीडियावर सोनू सूदने प्रतिक्रिया व्यक्त केली. सोनूने त्यांच्या व्हिडिओवर "तुम्ही मला नंबर पाठवा, मी गुरं पाठवेन" अशी कमेंट केली आहे. सोनूची ही कमेंट व्हायरल झाली असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सदर व्यक्ती बैलाची देखभाल करण्यासाठी आणि त्याच्या मातीने शेत नांगरण्यासाठी खूप वयस्कर आहेत. त्यावर सोनूने कमेंट केली की त्यांना ट्रॅक्टर कसा चालवायचा हे माहित नाही पण गुरंढोरं हा चांगला पर्याय असू शकतो.
सदर व्हिडीओ हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आहे. हे जोडपं आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या वृद्ध जोडप्याच्या मदतींसाठी स्थानिक प्रशासनही सक्रिय झालं आहे. लातूरच्या कृषी अधिकाऱ्यांनी या जोडप्याला मदत केली आहे. कृषी विभागात उपलब्ध असलेल्या सवलतीच्या उपकरणांबद्दल त्यांना सांगितलं असून लवकरच त्यांना ही उपकरण उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या व्यक्तीच नाव अंबादास पवार आहे. ते 65 वर्षांचे आहेत. गेल्या काही काळापासून ते आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे बैल खरेदी करायलाही पैसे नाहीत. त्यामुळे हे वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. हे जोडपं लातूर जिल्ह्यातील हाडोतळी गावातील रहिवासी आहेत. ते अडीच एकर कोरडवाहू जमिनीचे ते मालक आहेत.
त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तर सोनूच्या कृतीचंही कौतुक होतंय.
नवी सुरुवात ! तेजश्रीच्या मालिकेचं शूटिंग सुरु की नव्या प्रोजेक्टची नांदी ?फोटो आले चर्चेतFAQs :
प्रश्न: सोनू सूदने कोणत्या प्रकारची मदत जाहीर केली?
उत्तर: त्याने "मी गुरं पाठवीन" असं सांगत शेतकऱ्याला बैल किंवा त्याऐवजी उपयोगी प्राणी देण्याचं आश्वासन दिलं.
प्रश्न: सोनू सूद आधीही अशा प्रकारे मदत करत होते का?
उत्तर: होय, कोरोनाकाळापासून सोनू सूद अनेक गरजू लोकांना वैयक्तिक पातळीवर मदत करत आले आहेत.
प्रश्न: या घटनेवर लोकांची प्रतिक्रिया कशी आहे?
उत्तर: लोकांनी सोशल मीडियावर सोनू सूदचं कौतुक केलं असून या वृद्ध शेतकऱ्याच्या जिद्दीचंही भरभरून अभिनंदन केलं जात आहे.