राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः विज्ञान लेखनाला प्रोत्साहन, मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थी गटासाठी (बारावीपर्यंत) ‘मोबाइलपासून मैदानाकडे’ आणि खुल्या गटाकरिता देहदान आणि अवयवदान हे विषय आहेत.
स्पर्धेसाठी निबंध ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावेत. निबंधाची शब्दमर्यादा १५००ते २००० असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. विराज चाबके, कोषाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभागाद्वारा वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी- ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत. ही स्पर्धा विनाशुल्क असून, विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) कार्यवाह डॉ. उमेश संकपाळ अथवा http://mavipa.org किंवा https://gjcrtn.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.