ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ती कायम तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी डार्लिंगने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने हा खुलासा करताना टीम इंडियाचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल याचे नाव घेतले आहे.
”मी आणि मुनाफ मित्र होतो. आम्ही एका क्लबमध्ये भेटलो व त्या रात्री आम्ही बराच वेळ पार्टी केली. अनेक लोकांनी त्या रात्री आम्हाला एकत्र पाहिलं आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या नात्यात नव्हतो पण मी भावनिकरित्या त्याच्याशी जोडली गेली होती. मी त्याला प्रेम नाही म्हणणार पण वन नाईट स्टँड म्हणू शकेन’, असे बॉबीने या मुलाखतीत म्हटले.
बॉबीने जेव्हा तिच्या व मुनाफच्या मैत्रीविषयी मीडियात सांगितले त्यानंतर त्याने तिच्याशी मैत्री तोडली असेही तिने या मुलाखतीत सांगितले आहे. ”मी जेव्हा आमच्या मैत्रीविषयी सार्वजनिकरित्या बोलले तेव्हा तो रागवला. त्याने मला सांगितले तकी या सगळ्यामुळे माझी बदनामी होतेय. इतर क्रिकेटपटू माझ्याविषयी काय विचार करतील. काय बोलतील ते? त्यानंतर मुनाफने माझ्याशी बोलणेच बंद केले”, असेही बॉबीने सांगितले.