मोठा दरोडा टाकण्याची तयारी! 'एक चूक नडली अन् सगळंच संपल': एकास अटक; चौघे फरार, अक्कलकोट तालुक्यातील थरारक घटना
esakal July 04, 2025 03:45 PM

अक्कलकोट : मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीतील एकास पोलिसांनी हन्नूर परिसरातून मोठ्या शिफातीने अटक केली. ही परजिल्ह्यातील टोळी मोठा धाडसी दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. गॅस कटर, साहित्य व चोरी केलेले छोटा हत्ती वाहन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. याची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

सातारा तालुका हादरला! 'मैत्रीण दुसऱ्याबरोबर दिसल्याने मुलाने जीवन संपवले'; तिने मला धोका दिला मी जगणार नाही अन..

पोलिस हेड कॉन्स्टेबल मल्लिनाथ सिद्धप्पा कलशेट्टी यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार आरोपीतांची नावे बाळू किसन पवार (वय ३९, रा. बोरसर बुद्रुक, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) लक्ष्मण नामदेव जगताप, विक्रम बाळासाहेब बोरगे, दोघे रा. भगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, पिंट्या (पूर्ण नांव व पत्ता माहिती नाही), सोन्या अशी आहेत. ही घटना ३ जुलै रोजी ३ वा.चे सुमारास हन्नुर बसस्टॉप जवळील रोडवर घडली.

आरोपींतांकडून एक ऑक्सिजन प्रेशर टाकी, त्यास गॅस कटर किट जोडलेले दोन पाईप, दोन किलो वजनाचे एचपी कंपनीची एक गॅस टाकी, पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी, एक कोयता, एक लोखंडी पाईप, एक लोखंडी रॉड, स्प्रेची बाटली, एका कॅरीबॅगमध्ये लाल रंगाची मिरची पावडर, सहा चाव्यांचा बंच व एक चोरून आणलेली टाटा छोटा हत्ती (एमएच १३ सीयू ६१०२) असे साहित्य चोरट्याकडून जप्त करण्यात आले.

कराड तालुका हादरला! 'कोयत्याने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, राजकीय चर्चा सुरू असतानाची घटना

वरील सगळ्या आरोपींनी एकत्र येत कट रचून साहित्यासह चोरीच्या छोटा हत्तीतून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सकाळी सहा वाजता जात होते. त्यावेळेस पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.