Nagpur Power Plant Ash Collection : वीज केंद्रातील राख कुणीही न्या! जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचा निर्णय
esakal July 04, 2025 08:45 PM

खापरखेडा : कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पातून दररोज निर्माण होणारी हजारो मेट्रिक टन कोळशाची राख आता कोणत्याही उद्योजकाला मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला आहे.

हा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस कोराडीचे मुख्य अभियंता विलास मोटघरे, खापरखेड्याचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ही राख विटाभट्टी, सिमेंट पाइप, पेव्हर ब्लॉक, ले-आउट फिलिंग, दगड खाणी, बांधकाम व्यवसाय व लघुउद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सरकारी व निमसरकारी प्रकल्पांसाठी राख वाहतुकीसाठी प्रति टन १२५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.नागपूरव परिसरातील उद्योगांना ही राख खसारा, वारेगाव, नांदगाव येथील राखबांधांमधून मोफत दिली जाणार आहे.

राख वितरण महानिर्मिती विभाग आणि पर्यावरण विभागाच्या नियमानुसारच केले जाईल. ही योजना स्थानिक उद्योग, बांधकाम क्षेत्र व लघुउद्योगांना मोठा फायदा देणारी आहे. इच्छुक उद्योजकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कोराडी व खापरखेडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leopard Attack in Khapa-Dhotiwada : गोठ्यातील बकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला;पाच बकऱ्या ठार, खापा-धोतीवाडा येथील घटना

दैनंदिन राख उत्पादन मेट्रीक टन

कोराडी प्रकल्प १२,०००

खापरखेडा प्रकल्प ७,०००

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.