Botox Treatment : बोटॉक्स ट्रिटमेंट म्हणजे काय?
Marathi July 04, 2025 02:25 AM

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) निधनाने सर्वानाच धक्का बसला आहे. सध्या शेफालीच्या मृत्युची विविध कारणे सांगण्यात येत आहेत. काही रिपोर्टनुसार शेफाली घेत असेल्याला अँटी-एजिंग ट्रिटमेंटमुळे तिला जीव गमवावा लागला असं बोलले जात आहे. पोलिस तपासातही असे समोर आले आहे की, शेफाली बऱ्याच दिवसांपासून वृद्धत्वविरोधी उपचार (Anti Aging) ट्रिटमेंट घेत होती. या घटनेनंतर आता अँटी-एजिंगसाठी घेतल्या जाणाऱ्या ट्रिटमेंट चर्चेत आल्या आहेत. त्यापैंकी एक आहे बोटॉक्स (Botox Treatment) बोटॉक्सची क्रेझ हल्ली बऱ्याच तरूण मंडळीमध्ये दिसत आहे. पण, खरंच या ट्रिटमेंटमुळे तरुण दिसता येते का? जाणून घेऊयात बोटॉक्स ट्रिटमेंट म्हणजे काय

बोटॉक्स म्हणजे काय?

बोटॉक्स हे एक प्रकारचे इंजेक्शन असते. हे इंजेक्शन बोटुलिनम नावाच्या औषधापासून बनवले जाते. या औषधामुळे नसांवर परिणाम होतो आणि मसल्स लवचिक बनतात. त्यामुळे याचा वापर कॉस्मेटिक सर्जरी आणि वैद्यकिय अभ्यासात केला जातो. या इंजेक्शनमुळे सुरकुत्या कमी होतात आणि मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पण, या बोटॉक्स ट्रिटमेंटची प्रभाव खूप कमी महिने राहतो कालांतराने हळूहळू पूर्णपणे नाहीसा होत जातो.

कोणत्या अवयवावर केली जाते Botox Treatment?

  • नाक
  • भुवयांच्यामध्ये
  • कपाळ
  • ओठ
  • हनुवटी
  • जबड्याची रेषा
  • मूल्य

बोटॉक्समुळे होणारे फायदे –

  • सुरकुत्या कमी होतात
  • अति घाम येणे थांबते
  • पाठदुखीपासून आराम
  • त्वचेचा पोत सुधारतो
  • मानदुखीवर परिणामकारक
  • पायांमध्ये होणारी वेदना थांबते
  • संधिवातापासून सुटका

बोटोक्साचे साइड इफेक्ट्स –

  • इंजेक्शनच्या ठिकाणी सूज, वेदना आणि लालसरपणा
  • त्वचेवर लालसरपणा
  • डोकेदुखी
  • मानदुखी
  • मूत्रपिंडाशी संबंधित समस्या

बोटॉक्सचे उपचार कोणी घेऊ नयेत?

  • तुम्ही गर्भवती असाल तर तज्ज्ञमंडळी बोटॉक्स ट्रिटमेंट न घेण्याचा सल्ला देतात.
  • स्तनपान करणाऱ्या महिलांनी बोटॉक्स ट्रिटमेंट घेणे टाळावे.
  • चेहऱ्याचे मसल्स कमकुवत असतील तर बोटॉक्स ट्रिटमेंट घेणे टाळावे.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=docl7bfdihu

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.