थोडक्यात :
शरद उपाध्ये यांनी केलेल्या आरोपांनंतर डॉ. निलेश साबळे यांचा स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
निलेशने त्या व्हिडीओत शांतपणे आपली बाजू मांडत सर्व निर्णय टीमचा असल्याचं सांगितलं.
यावर प्रतिक्रिया देताना एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत निलेशच्या संयमित उत्तराचं कौतुक केलं.
Marathi Entertainment News : काही दिवसांपासून निलेश साबळे आणि शरद उपाध्ये यांच्यातील वाद गाजतोय. चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करणार आहे. त्यामुळे निलेशला कार्यक्रमातून काढून टाकण्यात आलं अशी चर्चा रंगली. त्यातच शरद उपाध्ये यांनी निलेश यांच्यावर आरोप केले. यावर निलेश साबळेने व्हिडिओच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. या प्रकरणावर आता मराठी अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निलेश यांना पाठींबा दिला. शरद उपाध्ये यांच्या वागण्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. काय म्हणाले किरण माने जाणून घेऊया.
किरण माने यांची पोस्ट :"निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे.
‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???
तुकोबाराया सांगून गेले आहेत,
“सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।।
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।”
कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक... आणि म्हण, “ए चल्... हवा येऊ दे”
खुप शुभेच्छा मित्रा.
- किरण माने."
View this post on InstagramA post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)
किरण यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत निलेशला पाठींबा दिला. "किरण माने तुम्ही बरोबर बोललात","प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्टॅन्ड घेता कशाचीही पर्वा न करता हे भारी आहे" अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत.
काय आहे प्रकरण ?निलेश साबळे चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार नाही हे समजल्यावर शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे हे अहंकारी असल्यामुळेच त्यांना या शोमधून काढून टाकलं अशी टीका केली. याशिवाय त्यांचा चला हवा येऊ द्याच्या सेटवरील अनुभव शेअर केला. याला निलेश साबळेने व्हिडिओच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं.
FAQs :
प्रश्न: निलेश साबळे यांचा स्पष्टीकरणात्मक व्हिडीओ कुठे पाहायला मिळतो?
उत्तर: हा व्हिडीओ Instagram आणि YouTube सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
प्रश्न: शरद उपाध्ये यांनी नक्की काय आरोप केले होते?
उत्तर: त्यांनी सांगितलं की डॉ. निलेश साबळेंना लोकप्रियतेचा गर्व झाला असून त्यामुळे काहीजणांना शोमधून बाहेर काढण्यात आलं.
प्रश्न: मराठी अभिनेत्याने नेमकी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: त्या अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की निलेशने अतिशय संयम राखून उत्तर दिलं आणि त्याचा तो आदर करतो.