श्रीरामपूर : उत्तर नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात देसाई यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड तालुका हादरला! 'कोयत्याने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, राजकीय चर्चा सुरू असतानाची घटनातृप्ती देसाई यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नितीन दिनकर हे महिलांना भाजपमधील पद देण्याचे आमिष दाखवून ढाब्यावर पार्ट्यांचे आयोजन करतात, नाचगाण्याचे कार्यक्रम घेतात आणि रात्री उशिरापर्यंत महिलांना थांबवून त्यांचा मानसिक छळ करतात. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांना पोलिस संरक्षण मिळाल्यामुळे कोणीही विरोध करण्यास घाबरते.
अहिल्यादेवी होळकरांच्या नावावर जिल्ह्याचे नामकरण करून महिलांचा सन्मान केला जात असताना, पक्षातीलच पदाधिकाऱ्यांकडून महिलांवर अन्याय होतोय, हे लज्जास्पद आहे. त्यामुळे नितीन दिनकर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने दूर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सदर व्हिडिओ माझ्या कौटुंबीक कार्यक्रमातील असून, तो एडिट करून खोटे आरोप करत देसाई यांनी माझी, माझ्या कुटुंबीयांची आणि अल्पवयीननातेवाईक मुलीची बदनामी केली आहे. यामागे राजकीय द्वेष असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, असे दिनकर यांनी म्हटले आहे.
सातारा तालुका हादरला! 'मैत्रीण दुसऱ्याबरोबर दिसल्याने मुलाने जीवन संपवले'; तिने मला धोका दिला मी जगणार नाही अन..श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, दिनकर यांच्या तक्रारीवरून देसाई यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाच्या परवानगीने पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.