केस मागे का घेत नाही? घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील धक्कादायक घटना
Marathi July 05, 2025 07:25 AM

बीड गुन्हा: बीडच्या केज (Kej) तालुक्यातील डोका गावामध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबीता भांगे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीच्या फिर्यादीवरून सात जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणात झालेली केस मागे का घेत नाही? या कारणातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. (Beed Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील डोका येथे दि. ३ जुलै रोजी सकाळी सुनील भारत भांगे हे त्यांची म्हैस घराच्या समोर बांधत होते. यावेळी त्यांची मुलगी राजश्री यांना काहीजण हातात तलवार, कोयता, लोखंडी पाईप आणि दगड घेऊन आपल्या घराकडे येत असल्याचे दिसून आले. यानंतर सुनील भांगे हे घरी गेले असता विक्रम भागवत भांगे, सागर विक्रम भांगे आणि विशाल विक्रम भांगे हे कोयते व तलवार घेऊन त्यांना म्हणाले की, तुम्ही जुनी दाखल केलेली केस मागे का घेतली नाही? पुन्हा दोन दिवस अगोदर आमच्यावर का केस केली? असे म्हणून त्यांनी सुनीलची पत्नी बबीता भांगे हिच्यावर तलवारीने हल्ला केला.

महिलेची प्रकृती गंभीर

यात बबीता हिच्या दोन्ही खांद्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे ती खाली पडली. त्यानंतर सुनीलचे वडील भरत भागवत भांगे हे धावून आले असता त्यांच्यावर पण हल्लेखोरांनी डोक्यात व उजव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने हल्ला चढवला. हे पाहून मुलगी राजश्री ही आरडा ओरड करत असताना तिला देखील लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. या भांडणात महिलेसह चौघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या बबिता भांगे हिच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

महादेव मुंडेंना मारुन टेबलावर हाडं, कातडं ठेवली; बाळा बांगरांच्या आरोपानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Beed Crime News: बीड हादरलं! वाल्मीक कराडच्या चेल्याकडून गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; कराडवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पाण्याच्या टाकीवर केलेलं आंदोलन

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.