वरळी डोममध्ये उद्या ठाकरी बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आता समोर आलीय. या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रम स्थळ, पदाधिकारी आणि निमंत्रक म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे आहेत. निमंत्रण पत्रिकेवर 'आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा' असे लिहिलेले आहे.
उद्याच्या या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. याचबरोबर, लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या बातमीची दखल घेतली जात आहे.