Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले
Saam TV July 05, 2025 05:45 PM
मराठी-हिंदी भाषा वादावर उत्तर प्रदेशचे भाजपचे नेते दिनेश लाल यादव यांची प्रतिक्रिया Badlapur: बदलापूर गोळीबार प्रकरणातील आरोपी अटकेत; शस्त्र व दुचाकी जप्त

बदलापूर पश्चिममधील चिंचेश्वर पाडा येथे आमदार किशन कथोरे यांच्या घराजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर गडदे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले देसी बनावटीचे पिस्तूल व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

Dharashiv: कंञाटदार,बेरोजगार अभियंता व मजुर संस्थांची 89 हजार कोटींची देयके रखडली

राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंञाटदार,सुशिक्षीत बेरोजगार अभियंता,हॉट मिक्सधारक कंञाटदार, मजुर संस्था व विकासक याची विविध विभागाकडील 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत.ही देयके तातडीने देण्यात यावी अशी मागणी धाराशिव कंञाटदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे करण्यात आलीय.गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने आंदोलन करुनही याकडे दुर्लक्ष केल जात असुन या व्यवसायावर अवलंबून असलेले करोडो घटकांचे कुटुंब व त्यांचा चरितार्थ हे आर्थीक अडचणीत आहेत.त्यामुळे ही प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

Maval: मावळ्याच्या आडले बुद्रुक गावातील शालेय विद्यार्थ्यांनी काढली पालखी..

आषाढी एकादशी निमित्ताने मावळच्या आढळे बुद्रुक येथील शालेय विद्यार्थ्यांनी साजरा केला पायी वारी पालखी सोहळा. महाराष्ट्राची परंपरा असलेला आणि संत साहित्याचा मार्ग दाखवत राम कृष्ण हरी चा गजरही केला. आढळे येथील कर्मवीर विद्यालय पासून निघालेली पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत मार्गे शाळेत विसर्जित करण्यात आली. या पालखी सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, विठ्ठल, रखुमाई यांचा पारंपरिक वेश धारण केल्याने सर्वांचे लक्ष वेधत होता.

कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

सह्याद्रीच्या कुशीत गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे डिंभे धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. यावर्षी १ जूनपासून आतापर्यंत ४५१ मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा अत्यंत समाधानकारक आहे.डिंभे धरण हे कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं धरण असून, यातील पाणी शेती आणि पिण्याच्या गरजांसाठी महत्त्वाचं मानलं जातं.

वरळी डोमबाहेर बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो

वरळी डोमच्या बाहेर आम्ही गिरगावकर यांनी पोस्टर लावला आहे. या पोस्टर वरती महाराष्ट्र माझा असं लिहलं आहे. बाळासाहेबांचा फोटो व उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र पाहायला मिळत आहेत.

जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत .त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल असा उल्लेख बॅनरवर पाहायला मिळतोय..

Raj Thackeray-Uddhav Thackeray: वरळी मध्ये आवाज मराठीचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत विजय सभा

वरळी डोमच्या बाहेर बॅनरबाजी

आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असा बॅनर वर उल्लेख

तर आवाज मराठीचा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी..

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे फोटो त्याचबरोबर विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊलींचा बॅनर फोटो..

Raj Thackeray-Uddhav Thackeray: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे. विजयी मेळानिमित्त दोघेही एकत्र दिसणार आहे. वरळी डोम येथे हा विजयी मेळावा होणार आहे.

भिमाशंकर परिसरातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भात लागवडीला आता वेग आलाय

डोंगरमाथ्यावरील भातशेती हे आदिवासी नागरिकांसाठी उपजीविकेचं मुख्य साधन असुन यंदा पावसाचे लवकरच आगमन झाल्याने भात लागवडही लवकरच सुरू झाली असुन सध्या पावसाचा जोर कायम असल्याने भात खाचरांमध्ये आवणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरूय आतापर्यंत सुमारे १५ टक्के लागवड पूर्ण झाली असून पाऊसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रातही लवकरच लागवड पूर्ण होईल

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट खड्ड्यात, पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा जालन्यातील मठ तांडा येथे अपघात

जालन्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट खड्ड्यात जाऊन अपघात झाला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा जालन्यातील वडीगोद्री - जालना रोडवरील मठतांडा येथे हा अपघात झाला असून सुदैवान यात जीवितहानी झाली नाही. पंढरपूरला देवदर्शन साठी जाताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने वळण रस्त्यावरील कठडे तोडून कार थेट खड्ड्यात जाऊन पडली आहे. सुदैवानं कार मधील एअरबॅग उघडल्याने तीन भाविकांचा जीव वाचला आहे. अकोला येथील शिवाजी पवार हे कुटुंबांसह पंढरपूरला जात असताना हा अपघात झाला आहे.

खांद्यावर नांगर घेत शेतकरी निघाला विधानभावनाकडे

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा गावचा सहदेव होनाळे हा अल्पभूधारक शेतकरी खांद्यावर नांगर घेत पायी चालत मुंबईच्या विधानभावनाकडे निघालाय.. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन हा शेतकरी लातूरच्या अहमदपूर मधून पायी चालत निघाला आहे. विधान भवनात जाऊन सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नावर जाब विचारणार असल्याचे देखील शेतकरी सांगत आहे.

वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन वाल्मीक कराडनेच परळीतील महादेव मुंडे यांची हत्या करायला लावली आणि हत्येनंतर वाल्मीक कराडच्या समोर टेबलवर मांस आणि रक्त ठेवलं होतं असा धक्कादायक खुलासा वाल्मीक कराडचे कधीकाळी सहकारी राहिलेल्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला होता. यानंतर पोलीस अधीक्षकांना भेटून यासंदर्भात आपण तक्रार दाखल करणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान म्हटलं होतं. यावर त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिलं आहे तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांकडे उद्याच जबाब नोंदवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून त्याच्या चेल्यांनीच हा खून केल्याचे यावेळी त्यांनी म्हटलं.. तर जोपर्यंत महादेव मुंडेंचे हत्यारे जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई सुरूच राहील असं देखील विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी सांगितले.

आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मातेला सोन्याचे नक्षीकाम केलेला पोषाख अर्पण

आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर येथील एका विठ्ठल भक्ताने 9 तोळे सोन्याचे नक्षी काम केलेला पोषाख देवाला अर्पण केला आहे. शुभम तिवारी असं विठ्ठल भक्ताचे नाव आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी हा पोषाख देवाला परिधान करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पोषख मंदिर समितीकडे पाठवून दिला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देवाच्या महावस्त्राचा स्विकार केला.

गणेश खिंडमध्ये आकाश जमिनीवर उतरलंय

उंच डोंगरकड्यांवर टेकलेले पांढऱ्याशुभ्र ढग, हिरवागार सृष्टी, सोसाट्याचा वारा आणि कोसळणारा मुसळधार पाऊस – या साऱ्याचा मिलाफ म्हणजे मन मोहून टाकणारं निसर्गाचं जीवंत चित्रच जणू आकाश आणि जमिनीची भेट जणू येथेच झालीय असं भासावं असा हा नजारा पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय, शांतता, आल्हाददायक हवा आणि नयनरम्य दृश्ये अनुभवण्यासाठी लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत.

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड

पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेण्याची ग्वाही दिली.परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेचच एस आय टी स्थापन करण्यात आली.

पालघरमधून शेकडो शिवसैनिक विजयी मेळाव्यासाठी रवाना

पालघर मधील शिवसेना उबाठा आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना . दोन्ही ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी कार्यकर्ते खाजगी वाहनांसह रेल्वेने मुबई कडे रवाना . शिवसेना उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी . दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

दुपारी 1वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने पंढरपुरात आगमन...

दुपारी 2 वाजून 50 मिनीटांनी कृषि पंढरी महोत्सव उद्घाटनासाठी उपस्थित राहणार...

3 वाजून 50 मिनीटांनी पंचायत समितीमध्ये निर्मल वारी आणि चरण सेवा दिंडीच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार ...

सायंकाळी 5 वाजता सीसीटीव्ही इंटिग्रेटेड रूम उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी....

सायंकाळी 5 वाजून 20 मिनीटांनी अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती...

5 वाजून 45 मिनिटांनी विश्रामगृहावर होणाऱ्या पर्यावरण दिंडीच्या कार्यक्रमात सहभागी होतील...

उद्या पहाटे आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होणार...

वाटद पंचक्रोशीतील प्रकल्पासाठी भूसंपादन सुनावणीला सरुवात

रिलायन्सला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी वाटद पंचक्रोशीत होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी प्रांताधिकारी जीवन देईसाई यांच्यासमोर सुनावण्या सुरु झाल्या आहेत. घरे व धार्मिक स्थळे, आंबा बागायती वगळणे, मोबदला, नोकर्या याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली. यावेळी प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. एमआयडीसीनेही प्रदूषण विरहीत प्रकल्प येणार असलस्याचे लेखी स्पष्टीकरण प्रांताधिकार्यांना दिले आहे. वाटदसाठी जवळपास 904 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्यातील एक हजार एकर जागा ही रिलायन्स कंपनीच्या हत्यारे बनवणार्या कारखान्यासाठी दिली जाणार आहे.तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या सेमी कंडक्टर बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प होणार आहे या दोन प्रकल्पांमुळे जवळपास ३० ते ४० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.