पंजाब नॅशनल बँक ( PNB ) घोटाळ्याती प्रमुख आरोपी नीरव मोदी यांचा भाऊ नेहल दीपक मोदी याला अमेरिकेत अटक झाली आहे. सक्त वसुली संचनालय आणि सीबीआयच्या संयुक्त मागणीने अमेरिकेच्या न्याय विभागाने ४ जुलै रोजी नेहल मोदी याला अटक केली आहे.भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळ्याच्या तपासात हा एक मोठा मुत्सदी आणि कायदेशीर विजय मानला जात आहे.
पीएनबी घोटाळ्याचा प्रमुख फरार आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याची अटक भारताच्या औपचारिक प्रत्यार्पण अर्जानुसार झाली आहे. आता त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रीया अमेरिकेत सुरु झाली आहे. अमेरिकन सरकारी पक्षाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार नेहम मोदी याच्या विरोधात दोन मुख्य आरोपांच्या आधारे ही प्रत्यार्पण कारवाई केली जाणार आहे.
नेहल मोदी याच्यावर आरोप आहे त्याने त्याचा भाऊ नीरव मोदी याची मदत करीत कोट्यवधी रुपयांची अवैध कमाईला लपवले आणि तिचा शेल कंपन्या आणि विदेशी देवाण-घेवाणद्वारे पसरवली आहे. सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) आरोपपत्रात नेहल मोदी याला सह आरोपी म्हणून सामील केले आहे. आणि त्याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे २०१९ मध्ये इंटरपोलने नेहल मोदी याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. या आधी त्याचा भाऊ नीरव मोदी आणि निशाल मोदी याच्या विरोधात देखील इंटरपोलने नोटीस जारी केली होती. नेहल हा बेल्जियमचा नागरिक आहे आणि त्याचा जन्म एंटवर्म येथे झाला होता. त्याला इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषा अवगत आहेत.
भारतातून पसार झालेला नीरव मोदी हा ब्रिटनच्या तुरुंगात बंद असून त्याची प्रत्यार्पणाचा कारवाई चालू आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. त्यांच्यामुळे पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14,000 कोटींचे नुकसान झाले आहे.
नेहल मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलैला आहे. यात स्टेटस कॉन्फ्रेंस होणार आहे. यावेळी नेहल मोदी याच्यावतीन जामीनासाठी अर्ज देखील केला जाऊ शकतो. त्यास अमेरिकेतील सरकारी पक्ष विरोध करेल. ही कारवाई भारतीय तपास यंत्रणेचा मोठा विजय मानला जात असून त्यामुळे पीएनबी घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहचण्यास आणि दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यास बळ मिळणार आहे.