पाटणा: असदुद्दिन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. एमआयएमचे बिहारचे अध्यक्ष अख्तरुल इमाम यांनी महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहून, महाआघाडीतमध्ये सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बिहारमधील पक्षाचे एकमेव खासदार असलेल्या लोन यांनी समाज माध्यमांवर हे पत्र प्रसिद्ध केले आहे, बुधवारी (ता.२) पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे की, धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी ‘एमआयएम’ला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घ्यावे. यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राज्यात महा आघाडीचेच सरकार येईल, असा दावाही त्यांनी या पत्रात केला.
निवडणूकच लढवू नकाभाजपला पराभूत करायचे असल्यास एमआयएमने बिहारमध्ये निवडणूक लढवू नये, असे आवाहन आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी केले. तसेच ओवेसी यांच्या पक्षाला जागा देण्यासही त्यांनी नकार दिला.
Dalai Lama: धार्मिक स्वातंत्र्याला नेहमीच पाठिंबा; भारत सरकारची भूमिका, श्रद्धा आणि प्रथांबाबत बोलणार नाहीपत्रकार परिषदेमध्ये याबाबत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. महाआघाडीमध्ये सहा पक्ष असून विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी आघाडीतील घटक पक्षांनी १९६ जागांवर दावा केला आहे, त्यामुळे त्यात एमआयएमचा समावेश करून घेऊन, वाटेकरी वाढविण्यास आघाडीतील पक्ष तयार नसल्याचे मानले जात आहे.