सरकारी नोकरीची संधी! 1300 जागांसाठी भरती, इथे करा अर्ज
Tv9 Marathi July 06, 2025 12:45 AM

सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC ने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) या पदांसाठी 21 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या भरतीअंतर्गत 1340 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 जुलैपर्यंत अर्ज करु शकणार आहेत.

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • उमेदवारांना होमपेजवरील भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीनंतर उमेदवारांना फॉर्म भरावा लागेल.
  • फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करावा.
  • यानंतर भरलेला फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

अर्ज शुल्क किती आहे?

एसएससी जेई भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), अपंगत्व असलेल्या व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी), आरक्षणातील पात्र उमेदवार आणि माजी सैनिक वगळता, इतर सर्वांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. वरील सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.

पात्रता

वरील पदाशी संबंधित बी.टेक पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. मात्र अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट दिली जाईल, तसेच ओबीसी प्रवर्गाला तीन वर्षांची सूट दिली जाईल. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 1,12,400 रुपये पगार दिला जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.