Pradosh Vrat Dates 2025: श्रावण महिना म्हणजे भक्ती, उपासना आणि भगवान शंकराला अर्पण केलेल्या श्रद्धेचा काळ. या पवित्र महिन्यात अनेक व्रत-पूजा केल्या जातात, पण त्यामध्ये प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. यंदा श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होणार असून, या महिन्यात दोन प्रदोष व्रत येणार आहेत. या दिवशी शिव उपासनेचा दुपटीने लाभ मिळतो.
प्रदोष व्रत म्हणजे काय?प्रदोष व्रत हा त्रयोदशी तिथीला ठेवला जाणारा उपवास आहे, जो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात येतो. हा दिवस भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. असा विश्वास आहे की, जो कोणी या दिवशी श्रद्धेने उपवास करून शिवपूजन करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो.
Harmful Foods to Avoid: निरोगी राहायचंय? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे 10 सर्वात घातक अन्नपदार्थ आजपासूनच टाळा! श्रावण 2025 मध्ये प्रदोष व्रते कोणत्या दिवशी येणार? 1. पहिला प्रदोष व्रत : 22 जुलै (मंगळवार)श्रावण महिनासुरू होण्याआधीच पहिला प्रदोष व्रत २२ जुलै रोजी असेल. या दिवशी त्रयोदशी तिथी सकाळी ७:०५ वाजता सुरू होते. मंगळवार असल्यामुळे हा व्रत भौम प्रदोष म्हणून ओळखला जातो. याचा संबंध मंगळ ग्रहाशी असल्यामुळे, या व्रताने मंगळाच्या अशुभ परिणामांपासून संरक्षण होते आणि हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो.
2. दुसरा प्रदोष व्रत: ७ ऑगस्ट २०२५ (बुधवार)दुसरा प्रदोष व्रत ६ ऑगस्ट दुपारी २:०८ पासून सुरू होईल, आणि ७ ऑगस्ट सकाळी ७:०८ पर्यंत त्रयोदशी तिथी असेल. त्यामुळे व्रत ७ ऑगस्टला ठेवले जाईल. हा दिवस बुधवार असल्यामुळे याला बुध प्रदोष व्रत म्हणतात. बुध ग्रहाचे संतुलन साधण्यासाठी आणि बुधाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी हा व्रत उपयुक्त मानला जातो.
प्रदोष व्रताचे आध्यात्मिक लाभ- मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण
- पापांपासून मुक्ती
- विवाह, संतानप्राप्ती आणि करिअरमधील अडथळ्यांचे निवारण
- मानसिक शांती आणि संतुलन
- चंद्र, मंगळ, बुध यांसारख्या ग्रहदोषांपासून संरक्षण
- शिवधामाची प्राप्ती आणि मोक्षाचा मार्ग
Viral Post of Soham Parekh : दिवसाला 2.5 लाखांची कमाई, अनेक कंपन्यांमध्ये एकाचवेळी नोकरी; नेमका कोण आहे हा सोहम पारेख?शिवाच्या कृपेने भरलेल्या या व्रताचा लाभ घेण्यासाठी श्रद्धेने उपवास करणे, शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करणे आणि संध्याकाळी शिवमंत्रांचा जप करणे फार फलदायी मानले जाते.