भारतीय कसोटी संघाने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी कर्णधार शुबमन गिल याच्या ऐतिहासिक शतकाच्या मदतीने दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला. भारताकडे पहिल्या डावातील 180 धावांचा आघाडी होती. भारताने अशाप्रकारे इंग्लंडसमोर 608 रन्सचं टार्गेट दिलं. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 72 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 556 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या विजयासाठी आणखी 7 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे आता भारताने इंग्लंडला झटपट गुंडाळून मोठ्या फरकाने विजय मिळवून द्यावा, अशी आशा भारतीय चाहत्यांना असणार आहे.