अभिनेत्याच्या हेअर स्टाईल आणि कपड्यांची कॉपी करणारे त्यांना काय खायला आवडते याचीही माहीती ठेवून असतात. आज आपण बॉलीवूडच्या बड्या स्टार मंडळींचे फेव्हरेट फूड काय आहेत याची माहीती सांगणार आहोत. येथे अमिताभ बच्चन, सलमान खान आणि ऐश्वर्या राय सह अनेक सुपरस्टारना काय खायला आवडते हे जाणून घ्या
बॉलीवूड स्टार सलमान खान याची आवडनिवड तर चाहत्यांना माहीतीच असेल. सलमान एका इंटरव्युव्हमध्ये त्याला दाल चावल खूप आवडतो असे सांगितले होते. तसेच तो बिर्याणी देखील आवडीने खातो.
बिग बी यांना भेंडी खूप आवडते तर त्यांची सुन अभिनेत्री सौदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हीला मात्र मंगलोरियन फिश करी पसंद आहे. जी कर्नाटकची लोकप्रिय डीश आहे
‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा ही देखील फूडी पर्सन आहे. प्रियंका हीलाही देशी जेवण पसंत आहे. तिची फेव्हरेट डिश मक्के दी रोटी आणि सरसो का साग तिला पसंद आहे.
या पिढीचा सर्वात शानदार अभिनेता रणबीर कपूर याचे फेव्हरेट फूड जंगली मटण करी आहे. ही एक राजस्थानी डीश असून जेव्हा संधी मिळते तेव्हा रणबीर मस्त ओरपून जंगली मटण करी खातो
डान्स, एक्टींग आणि लुक्स प्रत्येक बाबतीत अव्वल असलेला स्टार ऋतिक रोशन याची फेव्हरेट डीश जी कोट्यवधी भारतीयांचा नाश्ता आहे. बरोबर ओळखलंत ऋतिकला समोसा खूप आवडतो.
दीपिका पादुकोण ही आजच्या घडीची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री असून तिची फॅन फॉलॉईंग प्रचंड आहे. तिला रसम राईस खाणे सर्वाधिक पसंत आहे.
शाहरुख खान याला खाने पिणे जास्त आवडत नाही. परंतू त्याला तंदूरी चिकन खूपच आवडते.त्याने एका मुलाखती ही बाब सांगितली.
बिग बी अमिताभ बच्चन यांना आवडणारा पदार्थ जाणून तुमची बोटे तोंडात जातील, एंग्री यंग मॅन बच्चन यांना चक्क भेंडीची भाजी आवडते.