फक्त 30 मिनिटांत जुना फ्रिज होईल फ्रेश! खर्च न करता वापरा हे 3 घरगुती उपाय
Tv9 Marathi July 06, 2025 07:45 PM

घरात जुना फ्रिज असेल आणि तो न वाजवता वाजतोय, बर्फ नीट जमत नाही, किंवा कूलिंगसुद्धा एवढी कमी झाली आहे की वाटतं, “बास, आता नवीन घ्यावाच लागेल!”… पण थांबा! नवीन फ्रिजवर हजारो रुपये खर्च करण्याआधी हे वाचा. एका अनुभवी प्रोफेशनल टेक्नीशियनने असे काही खास उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमचा 10-12 वर्ष जुना फ्रिज पुन्हा नवीनासारखा दिसू शकतो आणि कामही तसंच करेल.

हे सर्व उपाय अत्यंत सोपे असून, घरबसल्या तुम्ही स्वतः करू शकता आणि त्यासाठी खर्चही काही नाही. चला, बघूया काय आहेत हे ‘सीक्रेट टिप्स’, ज्यामुळे फ्रिज होईल पुन्हा सुपर कूल.

1. डीप क्लीनिंग

तज्ञ सांगतात की जुन्या फ्रिजची 70% समस्या फक्त नियमित सफाई न केल्यामुळे होतात. फ्रिजच्या आतल्या ट्रे, रॅक, गॅसकेट आणि वॉल्स यांची बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि पाण्याच्या मिश्रणाने स्वच्छता करा. तसेच फ्रिजच्या बाह्य भागासाठी मायक्रोफायबर कपड्याचा वापर करा. जर पेंट उडालं असेल, तर आकर्षक स्टिकर किंवा कवर वापरून तुम्ही त्याला नवीन लुक देऊ शकता. ह्या संपूर्ण कामासाठी जेमतेम 30 मिनिटं लागतील आणि तुमचा फ्रिज दिसेल बिलकुल नव्यासारखा.

2. डोअर गॅसकेट बदला

फ्रिजचा दरवाजा नीट बंद होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डोअरच्या आजूबाजूला असणारी रबरची पट्टी, ज्याला गॅसकेट म्हणतात, जर ती सैल झाली असेल किंवा फाटलेली असेल, तर थंड हवा बाहेर जाऊ लागते. त्यामुळे कूलिंग कमी होतं आणि वीजेचा वापर वाढतो. एक नवीन गॅसकेट लावल्याने फ्रिजची सीलिंग नीट होते आणि थंडी आतच राहते.

3. कूलिंग कॉइल आणि कंप्रेसरची नियमित सफाई करा

फ्रिजच्या मागील भागात असलेली कूलिंग कॉईल वर धूळ साचते आणि त्यामुळे थंड होण्याची प्रक्रिया मंदावते. ब्रश किंवा हलक्या हाताने वैक्यूम क्लीनरने ही धूळ हटवा. कंप्रेसरजवळ उष्णता साचू नये याची काळजी घ्या. दर काही महिन्यांनी एकदा ही देखभाल केली, तर फ्रिजची कार्यक्षमता टिकून राहते.

रोज फ्रिज वापरासाठी 5 सोप्या टिप्स
  •  फ्रिजचे दरवाजे उघडे ठेवू नका ( थंडी वाया जाते आणि वीज वाढते)
  • गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याआधी थंड होऊ द्या.
  • आवश्यकतेनुसारच वस्तू ठेवा कारण ओव्हरलोड केल्याने कूलिंग कमी होते.
  • दर 15 दिवसांनी फ्रिजमधील नको असलेले पदार्थ काढा.
  • गॅसकेट आणि कूलिंग कॉईलची नियमित स्वच्छता करा.
  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.