सुवर्ण दर: सोन्याचे दर आठवडाभरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात एका आठवड्यात 1410 रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीत सोन्याचे एका तोळ्याचे दर 98980 रुपये इतके आहेत. 22 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर देखील 1300 रुपयांनी वाढले आहेत. देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर काय आहेत जे जाणून घेणं महत्त्वाचं असेल.
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 98980 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचं दर 90750 रुपये इतका आहे.
सध्या मुंबईचेन्नई आणि कोलकाता येथील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 90600 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 98830 रुपये इतका आहे.
जयपूर, लखनौ, चंदीगडमध्ये सोन्याचा दर काय?
या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 98980 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 90750 रुपये इतका आहे.
हैदराबादचा दर?
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 98830 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 90600 रुपये इतका आहे.
भोपाळ आणि अहमदाबादमधील सोन्याचा दर
अहमदाबाद आणि भोपाळमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 98880 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 90650 रुपये इतका आहे.
आयसीआयसीआय ग्लोबल मार्केटसनं सांगितलं की या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबरमध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळेल. या आठवड्याच्या शेवटीपर्यंत एक तोळे सोन्याचा दर 1 लाखांच्यावर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोन्याचे दर शॉर्ट टर्म साठी 96500 रुपयांपासून वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या पार जातील, अशी शक्यता आहे.
सोन्याप्रमाणं चांदीचे दर आठवड्याच्या आधारे 2200 रुपयांनी वाढले आहेत. 6 जुलै रोजी चांदीचा दर 110000 रुपये प्रतिकिलो इतका आहे. इंदौरच्या सराफ बाजारात चांदीचे दर 5 जुलै रोजी 200 रुपयांनी कमी झाले.
आणखी वाचा