CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO
Saam TV July 06, 2025 08:45 PM

'चला हवा येऊ दया'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'चला हवा येऊ दया'च्या नवीन पर्वाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'चला हवा येऊ दया' पहिल्या सीझनने संपूर्ण जगाला खळखळून हसवले आहे. नवीन पर्वात 'चला हवा येऊ दया'च्या (Chala Hawa Yeu Dya 2) सूत्रसंचालनाची धुरा मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकर साकारणार आहे. या पर्वामध्ये अनेकांचे आवडते डॉ. निलेश साबळे पाहायला मिळणार नाही आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'चला हवा येऊ दया'मध्ये आता टीम पाहायला मिळणार आहेत. यात श्रेया बुगडे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे टीमचे मुख्य असणार आहे. त्यामुळे कॉमेडीची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. 'चला हवा येऊ दया'च्या या नवीन पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सच आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. चाहते शोसाठी खूप आतुर असल्याचे दिसत आहे.

'चला हवा येऊ दया' रिलीज डेट काय?

"कॉमेडीचंगँगवॉर गाजणार, महाराष्ट्र आता खळखळून हसणार! चला हवा येऊ दया - कॉमेडीचं गँगवॉर" असे कॅप्शन पोस्टला देण्यात आले आहे. 'चला हवा येऊ दया'चे नवीन पर्व 26 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर शनिवार-रविवार रात्री 9 वाजता 'चला हवा येऊ दया' पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'चला हवा येऊ दया'च्या प्रोमोमध्ये सर्व कलाकारांची अतरंगी स्टाइल पाहायला मिळत आहे. या शोनं 10 वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आताच्या नवीन सीझनमध्ये कोण-कसा धमाकुळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कॉमेडीचा डॉन कोण होणार? हे पाहण्यासाठी अवघ्या महाराष्ट्र वाट पाहत आहे.

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.