75681
मालवणात वारकरी दिंड्या लक्षवेधी
मालवण, ता. ६ : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन गेला असताना तालुक्यात काही शाळांमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. आज येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा व बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी काढली.
‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा विठुरायाचा जयघोष करत आणि विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले. मुलांनी साकारलेल्या या वेशभूषा सर्वांचेच आकर्षण ठरल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी ही वारकरी दिंडी काढली. मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिका राधा दिघे, स्वाती दळवी, पूर्वी गोवेकर, मानसी परुळेकर, तृप्ती वालावलकर, योगिता तारी आदी उपस्थित होते.