जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी अमेरिका पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. यासाठी कागदपत्रेही सादर करण्यात आली आहे. यात भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची अमेरिका पार्टीचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैभव तनेजा नेमके कोण आहेत याबाबत माहिती जाणून घेऊयात.
डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात मतभेद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात ‘बिग, ब्युटीफुल बिल’वरून मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे मस्क यांनी अमेरिका पार्टी या पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे मुख्यालय 1 रॉकर रोड, हॉथॉर्न येथे आहे. तसेच एलन मस्क हे या पक्षाचे मुख्य नेते आहेत. तर वैभन तनेजा यांच्यावर कोषाध्यक्ष पदाची जबाबजदारी देण्यात आली आहे.
2023 पासून टेस्लाचे सीएफओ
वैभव तनेजा हे ऑगस्ट 2023 पासून टेस्लाचे सीएफओ म्हणून काम करत आहेत. टेस्लाचा विस्तार होत असताना कंपनीला नफ्याच्या कठीण आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्यावेळी तनेजा यांनी कंपनीच्या अर्थ विभागाचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे.
दिल्ली विद्यापीठात शिक्षण
वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य क्षेत्रात पदवीधर झाले, तसेच ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी पीडब्ल्यूसीमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी 17 वर्षे भारत आणि अमेरिकेत काम केले. 2017 मध्ये ते टेस्लामध्ये आले. तेव्हापासून ते मस्क यांचे एक विश्वासू सहकारी आहेत.
पिचाई आणि नाडेला यांना टाकले मागे
2024 मध्ये वैभव तनेजा यांना एकूण 139 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1150 कोटी रुपये) पगार मिळाला. हा पगार सुंदर पिचाई (89 कोटी रुपये) आणि सत्या नाडेला (650 कोटी रुपये) या दोघांपेक्षा जास्त आहे. यातून टेस्लामधील त्यांची भूमिका स्पष्ट होते. आता के अमेरिकन राजकारणातही सक्रीय झाले आहेत.