बंगळूर : लॉटरीच्या नावाखाली ४० कोटी रुपये गोळा करून सुधा आणि सिद्धीराजू हे जोडपे फरार झाले आहेत. ही घटना बंगळूरच्या (Bangalore Lottery Scam) जरागनहळ्ळी येथे घडली. २० वर्षांपासून जरागनहळ्ळी येथे राहणाऱ्या या जोडप्याने लॉटरीच्या व्यवसायाच्या नावाखाली ६०० हून अधिक लोकांकडून पैसे जमा केले होते.
त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी त्यांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक त्यांच्याकडे केली होती. सुरुवातीला लॉटरीचे (Jaraganahalli Fraud Case) पैसे देणारे हे जोडपे गेल्या एक वर्षापासून पैसे न देता त्यांना त्रास देत होते. मात्र ३ जून रोजी हे जोडपे फरार झाले.
Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमीयाप्रकरणी पुट्टेनहळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या जोडप्याला अटक करण्यासाठी तीन पथकेही तयार करण्यात आली आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.