चाइम न्यूज: वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड अर्थातच “WCL मध्ये नोकरी लावून देतो असं सांगून अकोला आणि परिसरातील तब्बल 25 बेरोजगार तरुण-तरुणींना कोट्यवधी रुपयांनी गंडवण्यात आलंय. नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. दरम्यान, यामध्ये फसवणूक करणारा शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी केलाय.
“नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना नागपूर आणि अकोल्यातील दलालांनी मिळून डमी अधिकाऱ्यांची भेट घालून दिली. ‘WCL मध्ये पक्की नोकरी लावतो’ म्हणत प्रत्येकी 10 लाख रुपये वसूल करण्यात आलेय. संपर्कात होते वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील आशुतोष चंगोईवाला. आठ महिने उलटले, ना नोकरी मिळाली ना पैसे परत मिळाले. “बाजोरिया नाव घेत धमकावलं जातंय. आम्ही आता पोलिसात तक्रार केली आहे. अशी प्रतिक्रिया तक्रारकर्ता प्रफुल्ल वाघमारे यांनी दिली. तर सुरवातीला आम्हाला डमी ऑफिस दाखवले आणि त्यात आमची फसवणूक झाली. पैसे मागितल्यावर धमक्या दिल्या जातायत. असे मत नागपूरमधील तक्रारकर्ता वासुदेव हालमारे म्हणाला.
यश गुप्ता, स्वाती ढोरे, समृद्धी पवार, आनंद बोरतने, अक्षय बडगे, अमृता श्रोतरी, राहुल ठाकूर, श्रेयस देशमुख, किरण कोकुलवार, किरण कोकुलवार, कविता सपात्कार, मकरंद व्यवहारे, पराग वाघमारे, श्रद्धा वाघमारे, जानवी चक्रपाणी, मयूर बाचांवरे, राकेश शेलार, अशोक लोडम, जयेश खुलेकर, पूजा इंगळे, दर्शन धोटे, सौरभ तागडे, शिवम बदरके, श्याम कदम, दीक्षा खुलेकर आणि रोशन तायडे रोशन तायडे असे सर्व मुला-मुलींची नोकरीच आमिष दाखवत फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.
या सगळ्या प्रकारात शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र बाजोरियांनी हे आरोप फेटाळले आहेत. तर आरोपी आशुतोष चंगोईवालाने आपण बाजोरियांच्या नावाने कोणतीही धमकी दिली नसल्याचं म्हटलंय. चंगोईवालाशी माझा दहा वर्षांपासून काहीही संबंध नाही असे मत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यातील नागपूरातला आरोपी असलेल्या वासुदेव हालमारे याचे नागपूर येथील काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची माहिती मिळतीये. “WCL नोकरी फसवणूक प्रकरणात अजून बळी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेरोजगार युवकांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा