Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी
esakal July 07, 2025 01:45 PM

अथणी : कोल्हापूरहून देवदर्शन घेऊन जात असलेल्या भाविकांची मोटार व कर्नाटक परिवहनच्या बसमध्ये (Karnataka Transport Bus) झालेल्या अपघातात चौघे ठार, तर एक जण जखमी झाला. हा अपघात अथणीजवळ विजापूर राज्य मार्गावर रविवारी (ता. ६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. दरम्यान पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी येथे बडकोळ्ळमठाजवळ रविवारी पाच वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण साखळी अपघात (Athani Accident) दोघे ठार व सहा जण जखमी झाले.

राहुल अशोक मॅळशी (वय २५), राधिका राहुल मॅळशी (वय २२), गिरीष अशोक बिळ्ळुरगी (वय २८), संगमेश गिरीष अवरगोंड (वय २६) (सर्व जण रा. अफझलपूर, जि. गुलबर्गा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत; तर विनायक प्रसाद तिवारी (वय ३०, रा. गुलबर्गा) हा जखमीझाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीकडून महिला नगरसेविकेची चाकूने भोसकून हत्या; ती परपुरुषाशी बोलताना दिसली अन्...

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून (Police) मिळालेली माहिती अशी, राहुल मॅळशी आपल्या पत्नी व नातेवाइकांसह कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी तेथून परत गावाकडे जात असताना अथणी शहरापासून एक किलो मीटर अंतरावरील विजापूर मार्गावर कर्नाटक परिवहनच्या विजापूर-मिरज या बसला त्यांच्या मोटारीची धडक बसली. या भीषण अपघातात बसमधील कोणाला फारशी दुखापत झाली नाही; मात्र भीषण धडकेत मोटारीतील राहुल, गिरीष व संगमेश यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी राधिका व विनायक यांना नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी अथणी सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना राधिका हिचा मृत्यू झाला.

वाढदिवसादिवशीच तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन; कॉलेजला जाऊन आल्यापासून होता अस्वस्थ, रूपेशच्या बाबतीत असं काय घडलं?

तर, विनायक यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. दोन्ही वाहनांचे झालेले नुकसान पाहून व मोटारीत अडकलेले मृतदेह पाहून राज्य मार्गावरील प्रवासी हबकले होते. बसच्या चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे; तर मोटारीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उप्पार यांनी सहकाऱ्यांसह भेट दिली. या घटनेची नोंद अथणी शहर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस तपास करत आहेत.

गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी

अथणी शहरापासून काही अंतरावर मोठा अपघात झाल्याने अनेक वाहनधारक थांबून चौकशी करत होते. त्यामुळे गर्दी झाल्याने विजापूर-अथणी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. काही जणांनी जखमींना मदत करून उपचारासाठी पाठविले. प्रारंभी मृत व जखमींना मोटारीतून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. चालक व समोरील आसनावर बसलेले दोन्ही मृतदेह काढण्यासाठी अधिक प्रयत्न करावा लागला.

Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश सर्व नातेवाईक

राहुल व राधिका हे आपल्या दोघा नातेवाइकांना व विनायक या मित्राला घेऊन कोल्हापूरला गेले होते. संगमेश व गिरीष हे नातेवाईक आहेत. तर विनायक हा राहुल याचे मित्र असून, ते एसडीआरएफमध्ये सेवा बजावत आहेत. पाच जणांनी प्रवास करताना त्यातील केवळ विनायक हे बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.