Lessons from Warrant Buffet’s Investments: जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांची शेअर्स खरेदी करण्याची पद्धत जितकी प्रभावी आहे, तितकीच त्यांची शेअर्स विक्रीची रणनीतीही महत्त्वाची आहे. बहुतेक गुंतवणूकदार ‘कोणता शेअर खरेदी करावा?’ यावर भर देतात, पण ‘कोणता शेअर विकावा आणि तो केव्हा विकावा?’ याचं उत्तर बऱ्याच गुंतवणूकदारांना माहित नसते.
भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात 19 कोटीहून अधिक डीमॅट खाती आहेत. मात्र, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार जवळपास 90 टक्के गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. यामागे एक मोठे कारण म्हणजे सेलिंग स्ट्रॅटेजीचा अभाव. याच संदर्भात वॉरेन बफेंची स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे.
कंपनी समजून घ्या, मग निर्णय घ्याबफे म्हणतात, कंपनीचा नफा, बाजारातील स्थान आणि व्यवस्थापनाचे कौशल्य समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक किंवा विक्री करू नये. उदाहरणार्थ, जर एखादी कंपनी (जसे की एव्हिएशन सेक्टरमधील) सतत तोट्यात असेल, तिचा बाजारातील प्रभाव कमी होत असेल, तर तो शेअर विकण्याचा विचार करावा.
शेअरची खरी किंमत ओळखाजर एखाद्या स्टॉकची बाजारातील किंमत त्याच्या प्रत्यक्ष मूल्यापेक्षा खूप जास्त असेल, तर ती धोक्याची घंटा असते. बफे प्राइस टू अर्निंग रेशो, कॅश फ्लो आदी तांत्रिक बाबींचा वापर करून स्टॉकचे खरे मूल्य ठरवतात. ते म्हणतात, "If you don’t know the value of what you own, you're in trouble."
बाजार घसरला म्हणून घाबरू नकाबाजार पडला म्हणून ताबडतोब शेअर्स विकणे ही मोठी चूक आहे. जर कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल, तर त्या घसरणीकडे दुर्लक्ष करून स्टॉकवर लक्ष ठेवले पाहिजे. बफे सांगतात की तात्पुरता फायदा बघण्याच्या घाईत अनेकजण दीर्घकालीन संधी गमावतात.
संयम ठेवाबफेंची गुंतवणूक पद्धत वारंवार शेअर्स खरेदी-विक्री करण्याची नाही, तर समजूतदारपणे दीर्घकालीन गुंतवणुकीची आहे. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, “If you aren’t willing to own a stock for 10 years, don’t even think about owning it for 10 minutes.” संयमाने गुंतवणूक केल्याने मोठा नफा मिळतो.
विक्रीसाठी 4 मुख्य निकषबफे स्टॉक कधी विकायचा हे ठरवताना चार गोष्टी लक्षात घेतात:
कंपनीची मूलभूत स्थिती बिघडत आहे का?
त्याऐवजी अधिक चांगला स्टॉक पर्याय उपलब्ध आहे का?
सध्याचा शेअर आपल्या खरेदीच्या मूळ मूल्याच्या तुलनेत महाग झाला आहे का?
स्वतःमध्ये संयम आणि शिस्त आहे का?
या स्ट्रॅटेजीनुसार ते आपले पोर्टफोलिओ वेळोवेळी बदलत राहतात आणि मोठा नफा कमावतात.
भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावे?भारतीय बाजाराचे स्वरूप अस्थिर आहे. अशा परिस्थितीत वॉरेन बफेंची स्ट्रॅटेजी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन यश मिळवण्याची दिशा देऊ शकते. केवळ शेअरच्या चढ-उताराकडे न पाहता, स्टॉकची प्रत्यक्ष किंमत, कंपनीचे मूल्यमापन आणि ध्येयधोरणे पाहून गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. "शेअर बाजारात घाईचे नाही, संयमाचे फळ गोड असते", वॉरेन बफेंचा हा विचार भारतीय गुंतवणूकदारांनी नक्कीच लक्षात ठेवावा.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतजोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.