पाकिस्तानातून सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स (ISKP) या दहशतवादी संघटनेने नव्या नियतकालिकात तालिबानी लढवय्यांना ‘भविष्यातील विजयी संघटनेत’ सामील होण्याचे खुले आवाहन केले आहे. तालिबान आता कमकुवत झाला असून खलिफासाठी लढण्याचा ISKP हा एकमेव मार्ग असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
जगाला दहशतीच्या गर्तेत ढकलण्याचे षडयंत्र पुन्हा एकदा उघड कीस येत आहे. पाकिस्तानातून सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स (ISKP) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान आणि तालिबानवर हल्ला चढविणारे नवे नियतकालिक प्रसिद्ध केले आहेच, शिवाय युरोप, अमेरिका, चीन, रशिया आणि भारताला लक्ष्य करण्याची योजनाही उघड केली आहे.
दहशतवादाच्या या धोकादायक प्रतिध्वनीने आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. सीरियाच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवरही त्यांनी हल्ला चढवला होता. जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
83 पानांच्या नव्या नियतकालिकात ISKP ने तालिबानी लढवय्यांना ‘भविष्यातील विजयी संघटनेत’ सामील होण्याचे खुले आवाहन केले आहे. तालिबान आता कमकुवत झाला असून खलिफासाठी लढण्याचा ISKP हा एकमेव मार्ग असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
ISKP तुर्कस्तान, नंतर अमेरिका मार्गे युरोपमध्ये पोहोचण्याच्या तयारीत असल्याचेही मासिकात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर खोरासानच्या माध्यमातून (ज्याला ही संघटना आपला बालेकिल्ला समजते) चीन आणि रशियात पाय रोवण्याची योजना आहे. ISKP ने पहिल्यांदाच जागतिक अधिग्रहण योजना इतक्या स्पष्टपणे जाहीर केली आहे.
या नियतकालिकात काश्मीरबाबत दिलेले संकेत भारतासाठी धोक्याची घंटा आहेत. या संघटनेने काश्मिरी मुस्लिमांना सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे सांगितले आहे, ज्यावरून ISKP भारतात अशांतता पसरवू इच्छित असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच भारतीय गुप्तचर यंत्रणा या मासिकावर बारीक नजर ठेवून आहेत.
पाश्चिमात्य देशांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगत या नियतकालिकाने तालिबानी राजवटीवर टीका केली आहे. इतकंच नाही तर सीरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्यावरही अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी जवळीक असल्याबद्दल टीका करण्यात आली आहे.
ISKP चा हा उघड धोका आंतरराष्ट्रीय शांततेसाठी गंभीर धोका आहे. अशी नियतकालिके दहशतवाद्यांना प्रचाराचा डोस देतात आणि तरुणांना भडकवतात. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांपासून ते भारत, अमेरिका आणि युरोपीय देशांपर्यंत गुप्तचर यंत्रणा अशा कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.