“मला असं वाटत हेच मराठीचे महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का? मिळत कसे नाहीत? ज्यांनी आमच्यावर आरोप केले, त्यांच्या घरात राहतायत का? लाज वाटली पाहिजे. हिंदुंना वाचवू शकत नाहीत आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असं कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात दुर्देवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
मराठी विजयोत्सवातील भाषणांना रडगाणं, रुदाली असं म्हटलय. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्याची मानसिकता समजू शकतो. मूळ भाजप मेलेला आहे. त्याचाच खून या लोकांनी केलाय. त्यांचं जे काही रुदाली चालू आहे, रुदाली हा हिंदी शब्द आहे. त्यांनी जे काही उर बडवायला घेतलेत. आमच्या पक्षातले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ले उरबडवे घेतलेत. मूळ भाजपा ज्यांची शिवसेनेसोबत युती होती, त्या भाजपला या लोकांनी मारुन टाकलय” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे
“याचं दु:ख व्यक्त करताना, यांच्याकडे ऊर बडवायला ओरिजनल माणसं नाहीत. ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावी लागतात. फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. मराठी माणसाचे आंनदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुमचे आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातय. त्यावर “आम्ही एकत्र आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली आहे. ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि क्षमवता पण येत नाही. करणार काय?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.