बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh)चा काल (6 जुलै) वाढदिवस होता. वाढदिवसाला रणवीर सिंहने चाहत्यांना धमाकेदार सरप्राइज दिले आहे. रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'धुरंधर' (Dhurandhar ) हा ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात रणवीर सिंहचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
लांब केस, मोठी दाढी अशा ॲक्शन अवतारातरणवीर सिंह पाहायला मिळत आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत साऊथ अभिनेत्री झळकणार आहे. याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली. रणवीर सिंहसोबत काम करणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव सारा अर्जुन (Sara Arjun) आहे. 'धुरंधर'चा पहिला लूक पाहून चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सारा अर्जुन कोण?'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी सारा अर्जुन ही साऊथअभिनेत्री आहे. ती दाक्षिणात्य अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा अर्जुनने वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून अभिनयाला सुरुवात केली. तिने छोट्या जाहिरातींमधून काम करायला सुरूवात केली. तसेच तिने अनेक ब्रँडसोबत देखील काम केले आहे. सारा अर्जुन आता 20 वर्षांची आहे.
View this post on InstagramA post shared by Ranveer Singh (@ranveersingh)
2011मध्ये रिलीज झालेल्या 'देइवा थिरुमगल' या तमिळ चित्रपटातून सारा अर्जुनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला. तिला प्रसिद्धी मिळाली. चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले. सारा अर्जुनने आजवर हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहते आता तिला आणि रणवीर सिंहला एकत्र पाहाण्यासाठी खूप आतुर आहेत.
Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...