फक्त On-Off साठी नाही, तर AC च्या रिमोटमध्ये लपलेले असतात हे देखील फिचर्स, तुम्ही वापरता का?
Tv9 Marathi July 07, 2025 08:45 PM

उन्हाळा असो पावसाळा असो किंवा अगदी हिवाळा… AC वापरणं हा आपल्या रोजच्या आयुष्यातला भाग बनतो. घाम फुटायला लागला की लोक पटकन AC सुरू करतात. पण तुम्हाला माहितीय का, AC चा रिमोट म्हणजे केवळ on-off या दोन बटनांचा खेळ नसून एक छोटा संगणक (mini computer) आहे, ज्यात अनेक भन्नाट फीचर्स लपलेले असतात? आश्चर्य म्हणजे 90% लोक या फिचर्सचा योग्य वापरच करत नाहीत, ज्यामुळे अधिक वीज वापर, कमी कूलिंग, आणि AC चे आयुष्यही कमी होतं. चला तर मग, आज आपण ‘AC रिमोट’ मध्ये असलेल्या बटनांची माहिती आणि त्यांचा नेमका वापर कसा करायचा हे समजून घेणार आहोत.

Mode बटन

AC रिमोटवरील Mode बटन हे सर्वात महत्त्वाचं बटन असतं. यात अनेक पर्याय असतात:

  •  Cool Mode: उन्हाळ्यात वापरलं जातं, ज्यामुळे थंड हवा येते.
  •  Dry Mode: पावसाळ्यात उपयोगी. हवेतील आर्द्रता कमी करतो.
  •  Fan Mode: फक्त पंख्यासारखी हवा देतो, कंप्रेसर चालत नाही, त्यामुळे वीजेची बचत होते.
  •  Auto Mode: AC आपोआप वातावरणानुसार मोड ठरवतो.
  •  Heat Mode: काही AC मध्ये सर्दीच्या दिवसात गरम हवा देण्यासाठी हा मोड असतो.
Temperature Control

Temp + बटनांद्वारे तुम्ही तापमान वाढवू शकता. (तज्ञांच्या मते 25°C हे परफेक्ट तापमान आहे ) कारण यामुळे ना फार थंडी जाणवते ना वीजेचा जास्त खर्च होतो.

Sleep Mode

Sleep Mode हे रात्रीसाठी खास फिचर आहे. हे सुरू केल्यावर AC हळूहळू तापमान वाढवत जातं, त्यामुळे झोपेत फार थंडी जाणवत नाही. झोपही बिघडत नाही आणि वीजेची बचतही होते. ज्यांना रात्री AC चालू ठेवताना थंडी वाटते, त्यांच्यासाठी हे Mode फारच उपयुक्त ठरतं.

Timer

Timer बटनाचा वापर करून तुम्ही AC कधी सुरू किंवा बंद व्हावं हे ठरवू शकता. उदा. झोपताना तुम्हाला AC काही वेळाने बंद करायचं असेल, तर तुम्ही बंद होण्याचा टाइमर सेट करू शकता.

Smart / AI Mode

आधुनिक काळातले Smart AC आता AI Mode सह येतात. यात AC खोलीतील तापमान आणि हवेच्या परिस्थितीनुसार आपोआप मोड व तापमान सेट करतो. यामुळे सतत रिमोट वापरण्याची गरजही पडत नाही.

अजूनही बरेच कमाल फिचर्स

AC रिमोट हा केवळ चालू-बंद करण्यासाठी नसून एक स्मार्ट टूल आहे. त्याचा संपूर्ण वापर केल्यास तुमचं बिल कमी होईल, थंडावा जास्त मिळेल आणि ACही जास्त काळ टिकेल. त्यामुळे AC वापरताना रिमोटचे सर्व फिचर्स वापरून बघा फरक नक्की जाणवेल!

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.